Naxal : दिग्दर्शक कुणाल कोहलींची पहिली वेबसिरीज; राजीव खंडेलवाल लीड रोलमध्ये

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 March 2020

दर्जेदार निर्मितीसाठी ओळखल्या जाणाऱ्या 'जीसिम्स'ने 'नक्सल'च्या माध्यमातून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. या मालिकेची संकल्पना अर्जुन आणि कार्तिक यांनी 'झी5'च्या सहकार्यातून आखली आहे. ही मालिका भारतातील नक्षलवादी चळवळीवर बेतली आहे.

पुणे : कुणाल कोहली दिग्दर्शित 'नक्सल' हिंदी वेबसिरीज लवकरच 'झी5' वर प्रदर्शित होणार,राजीव खंडेलवाल यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'नक्सल' या वेबसिरीजच्या माध्यमातून अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशानदार यांच्या 'जीसिम्स'चे हिंदी मनोरंजन क्षेत्रातील निर्मितीमध्ये पाऊल टाकले आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
दर्जेदार निर्मितीसाठी ओळखल्या जाणाऱ्या 'जीसिम्स'ने 'नक्सल'च्या माध्यमातून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. या मालिकेची संकल्पना अर्जुन आणि कार्तिक यांनी 'झी5'च्या सहकार्यातून आखली आहे. ही मालिका भारतातील नक्षलवादी चळवळीवर बेतली आहे. या मालिकेसाठी तब्बल दिड वर्षांचे संशोधन केले गेले आहे आणि त्यासाठी या क्षेत्राशी संबंधित पत्रकार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे सहाय्य घेतले गेले आहे. या मालिकेमध्ये वेब जगतातील अनेक आघाडीचे चेहरे नक्षलवाद्यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. 

मामु सलमान खान अन् भाची आयतचा 'तो' व्हिडिओ व्हायरल; चाहते म्हणाले...
 

कुणाल कोहली हे बॉलीवूडमधील एक आघाडीचे दिग्दर्शक आहेत. त्यांनी फना, हम तुम, मुझसे शादी करोगी यांसारखे अत्यंत गाजलेले चित्रपट दिले आहेत. 'नक्सल' ही त्यांची पहिलीच वेबसिरीज असून ती त्यांच्या चित्रपटाएवढीच लोकप्रिय ठरेल, असा पूर्ण विश्वास आहे.

दिपिका पदुकोणचे सुपर हॉट फोटोशूट पाहून चाहते घायाळ! एकदा फोटो बघाच
 

“नक्सल'मधील अत्यंत आव्हानात्मक अशा विषयाच्या माध्यमातून वेबसिरीज या अत्यंत लोकप्रिय अशा माध्यमामध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण करण्याची संधी मिळत असल्याचा मला आनंद आहे. या मालिकेची संकल्पना अर्जुन आणि कार्तिक यांची आहे. मी त्यांच्याबरोबर या विषयावर गेले सात महिने विचारविनिमय करतो आहे. या मालिकेचा नायक राजीव खंडेलवाल आहे, हीसुद्धा महत्वाची गोष्ट आहे. कारण यांसारख्या विषयाला पूर्ण न्याय देण्याची त्याची क्षमता आहे.
अनुपम खेर यांची इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी; नाटकानं आणलं जवळ

'झी5'च्या संपूर्ण टीम मी मनापासून आभारी आहे. त्यातही 'झी5'चे मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण कटियाल यांचा मी खूपच आभारी आहे कारण त्यांनी या मालिकेच्या प्रत्येक बाबीमध्ये महत्वाची भूमिका पार पाडली आहे,” असे उद्गार कुणाल कोहली याने काढले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajiv Khandelwal is lead role in Director Kunal Kohlis First Web Series Naxal