राजपाल यादवची फिल्मी लव्हस्टोरी; शूटिंगसाठी परदेशात गेला अन्..

rajpal yadav
rajpal yadav

बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव हा सिनेसृष्टीतील दमदार कॉमेडियनपैकी एक आहे. अफलातून विनोदबुद्धी, चेहऱ्यावरील हावभाव आणि टायमिंगच्या जोरावर राजपालने इंडस्ट्रीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. राजपालने आतापर्यंत २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. कमी उंची, सामान्य पर्सनॅलिटी असतानाही राजपालने प्रेक्षकांची मनं जिंकली. राजपालचा जन्म १६ मार्च १९७१ रोजी उत्तरप्रदेशमधल्या कुंद्रा याठिकाणी झाला. १९९९ मध्ये त्याने करिअरची सुरुवात केली. त्याच वर्षी त्याचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. त्याचं अभिनयकौशल्य पाहून त्याला मोठमोठ्या भूमिकाही मिळू लागल्या होत्या. चांदनी बार, हंगामा आणि मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ यांसारख्या चित्रपटांतील त्याच्या भूमिकांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. 

२००३ या वर्षी राजपाल यादवच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. राजपालची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखीच आहे. २००३ मध्ये राजपाल एका शूटिंगनिमित्त कॅनडाला गेला होता. सनी देओलच्या 'हिरो' या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. कॅनडामध्ये त्याची राधाशी भेट झाली. शूटिंगसाठी तो तिथे फक्त १० दिवस थांबला होता. पण त्या १० दिवसांत राजपालला त्याच्या आयुष्यभराची जोडीदार भेटली. एका कॉफी शॉपमध्ये हे दोघं भेटले आणि हळूहळू दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. राजपाल पुन्हा भारतात परतण्याआधीच ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. याच वर्षी राजपाल आणि राधाने लग्नगाठ बांधळी. या दोघांना दोन मुली आहेत. 

वक्त, आन, मुझसे शादी करोगी, मै मेरी पत्नी और वो, मालामाल विकली, चुप चुप के, भागमभाग, ढोल, भुलभुलैंय्या, भूतनाथ, बिल्लू, किक २, वेलकम बॅक, जुडवा २ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने काम केलं. भूमिका कॉमेडी असली तरी राजपालच्या एंट्रीनेच चित्रपटाला वेगळं वळण मिळायचं. राजपालला आता पहिल्यासारखे चित्रपटांचे ऑफर्स येत नाहीत. मात्र तरीही इंडस्ट्रीत त्याच्या अभिनयाला फार महत्त्व आहे. या वर्षातही त्याचे हंगामा २ आणि टाइम टू डान्स हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com