Raju Shrivastav Health Update : राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीत होतेय सुधारणा

कॉमेडियनच्या सर्व चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
Raju Shrivastav Health Update
Raju Shrivastav Health UpdateRaju Shrivastav Health Update

Raju Shrivastav Health Update प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या आरोग्यासाठी चाहते सतत प्रार्थना करीत आहेत. राजू लवकर (Raju Shrivastav) बरा व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे. आता कॉमेडियनच्या प्रकृतीविषयी चांगली बातमी समोर आली आहे. राजू श्रीवास्तवचे मुख्य सल्लागार अजित सक्सेना यांनी कॉमेडियनच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट दिली आहे.

राजू श्रीवास्तवचे हातपाय हलू लागले आहेत. तो डोळे उघडतो आणि पत्नी शिखाकडे पाहतो. तिच्या हाताला स्पर्श करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो, असे राजू श्रीवास्तवच्या (Raju Shrivastav) प्रकृतीबाबत माहिती देताना अजित सक्सेना म्हणाले. माजी खासदार विनय कटियार यांनीही राजूची माहिती घेतल्याचे अजित सक्सेना यांनी सांगितले.

Raju Shrivastav Health Update
#KisiKaBhaiKisiKiJaan : सलमान खानने केला व्हिडिओ पोस्ट; फर्स्ट लूक टीझर

राजू खूप वेगाने बरा होत आहे. राजूला रुग्णालयात दाखल करून २७ दिवस झाले आहेत. आता असे दिसते आहे की तो लवकरच बरा होईल आणि पूर्वीप्रमाणेच पुन्हा एकदा आपल्यामध्ये दिसणार आहे. पत्नीच राजूला भेटायला जाते. ती येऊन सांगते की राजू हाताला स्पर्श करतात, डोळे उघडतात आणि पाहतात. अशा परिस्थितीत राजू लवकरच आपल्यात असतील, असे आम्हा सर्वांना वाटते. कारण, राजूची प्रकृती हळूहळू सुधारत आहे, असेही अजित सक्सेना म्हणाले.

राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची बातमी समोर आल्यानंतर कॉमेडियनच्या सर्व चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. चाहते आता त्या क्षणाची वाट पाहत आहेत जेव्हा त्याचे आवडते गजोधर भैया पूर्णपणे बरे होऊन त्यांच्या समोर येतील. राजू श्रीवास्तव १० ऑगस्टपासून एम्समध्ये दाखल आहेत.

Raju Shrivastav Health Update
Salman Khan : सलमानची ग्लास मिस्ट्री; पार्टीत पॅपराजींना पाहून घाबरला अन्...

राजू हॉटेलच्या जिममध्ये वर्कआउट करीत होता. ट्रेडमिलवर व्यायाम करताना छातीत दुखू लागले आणि पडला. राजू श्रीवास्तवला जिम ट्रेनरने तातडीने रुग्णालयात नेले. तेव्हापासून राजू दिल्लीच्या एम्समध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. आता हळूहळू राजूच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com