#KisiKaBhaiKisiKiJaan : सलमान खानने केला व्हिडिओ पोस्ट; फर्स्ट लूक टीझर

किसी का भाई किसी की जान हा फरहाद सामजी दिग्दर्शित ॲक्शन चित्रपट आहे
Salman Khan Latest News
Salman Khan Latest NewsSalman Khan Latest News

Salman Khan Latest News सलमान खानने जगभरातील चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले आहे. सलमानने (Salman Khan) मोस्ट अवेटेड फिल्म ‘किसी का भाई किसी की जान’मधील त्याच्या लूकचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ चित्रपटाशी संबंधित बाकीच्या सेलिब्रिटींना देखील टॅग केला गेला आहे.

इंडस्ट्रीत ३४ वर्षे पूर्ण झाल्याने २६ ऑगस्ट रोजी सुपरस्टार सलमान खानने आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाची झलक देऊन चाहत्यांची मने जिंकली. आता सलमानने चित्रपटातील नवीन लूकचा ५९ सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये सलमान खान बाईकवर बसून निर्जन भागात जाताना दिसत आहे.

Salman Khan Latest News
Salman Khan : सलमानची ग्लास मिस्ट्री; पार्टीत पॅपराजींना पाहून घाबरला अन्...

व्हिडिओमध्ये त्याच्या ब्रेसलेटची झलक दाखवली गेली आहे. व्हिडिओमध्ये चष्मा घातलेला सलमानचा रफ अँड टफ लूक खूपच नेत्रदीपक दिसत आहे. व्हिडिओमध्ये सलमान खान (Salman Khan) क्रूझर मोटरसायकलवरून लडाख व्हॅलीमध्ये फिरताना दिसत आहे. ट्रेडमार्क सनग्लासेससह सलमान खानचा लांब केसांचा लूक त्याच्या सस्पेन्सफुल व्यक्तिरेखेसाठी उत्साह वाढवणारा दिसतो.

हा टीझर व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत सलमान खानने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘किसी का भाई किसी की जान’. त्याच्या प्रोडक्शन हाउस सलमान खान फिल्म्सनेही हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की, आता ही तर फक्त सुरुवात आहे. या चित्रपटाच्या शूटिंगच्या सुरुवातीपासूनच चित्रपटाच्या शीर्षक आणि कलाकारांबद्दल अनेक अटकळ बांधल्या जात होत्या.

सलमानने पोस्टमध्येच चित्रपटाची स्टारकास्ट आणि टायटलबाबतच्या सर्व अटकळांना साफ खोडून काढले आहे. टीझरच्या माध्यमातून चित्रपटाची घोषणा करण्याची सलमानची कल्पना होती. सुपरस्टार अलीकडेच पूजा हेगडेसोबत लडाखमध्ये होता. त्याचवेळी व्हिडिओ देखील शूट करण्यात आला होता.

किसी का भाई किसी की जान हा फरहाद सामजी दिग्दर्शित ॲक्शन चित्रपट आहे. चित्रपटात सलमान खान, पूजा हेगडे आणि व्यंकटेश मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय बिग बॉस फेम शहनाज गिल देखील चित्रपटात दिसणार आहे. सलमान खान फिल्म्सच्या प्रोडक्शन बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटात ॲक्शन, कॉमेडी, ड्रामा, रोमान्स आणि इमोशन यासारखे घटक असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com