Rakhi Sawant : धनुष्य-गदा अन् दहा तोंडे, राखी बनली रावण; चाहत्यांच्या भावना दुखावल्या!

राखीनं दसऱ्याच्या निमित्तानं रावणाच्या वेशभूषेतील तो लूक शेयर केला आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.
Fatima aka Rakhi in Raavan Avtar
Fatima aka Rakhi in Raavan Avtar

Fatima aka Rakhi in Raavan Avtar : टीव्ही सेलिब्रेटी आणि अभिनेत्री राखी सावंत ही कधी काय करेल याचा भरवसा नाही. गेल्या अनेक दिवसांपासून राखी ही वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली आहे. तऱ्हेवाईक बोलणं, वागणं आणि आक्रमकपणा यामुळे राखीच्या वाट्याला कुणी जात नाही. राखीचं परखडपणा हा अनेकांना चांगलाच ठाऊक आहे. आता राखीचा व्हायरल झालेला तो व्हिडिओ चर्चेत आला आहे.

राखीनं दसऱ्याच्या निमित्तानं रावणाच्या वेशभूषेतील तो लूक शेयर केला आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर राखीला नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही भलत्याच भन्नाट आहे. नक्की राखीला काय म्हणायचं आहे, राखीमध्ये हे असं करण्याचं धाडसं येतं कुठून, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहेत. त्याला मिळालेला प्रतिसादही मोठा आहे. राखीनं हातात धनुष्यबाण घेत नेटकऱ्यांचे, चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

राखीपूर्वी उर्फीनं देखील अशाच प्रकारचा व्हिडिओ व्हायरल केला होता. तिनं तर गॉगलचा अनोखा वापर आणि फॅशन करुन नेटकऱ्यांना आगळेवेगळे सरप्राईज दिले होते. तिचा तो व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. त्यावरील प्रतिक्रियाही भलत्याच गंमतीशीर होत्या. आता उर्फीनंतर राखीन आपणही काही कमी नाही असे सांगत वेगळेपण दाखवून दिले आहे.

राखी काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली होती. तिनं आदिल दुरानीसोबत लग्न केले होते. मात्र त्यांचा तो संसार महिनाभरही टिकला नाही. दोघांनी एकमेकांवर गलिच्छ आरोप केले होते. यामुळे दोघांच्याही चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. राखीनं देखील खालच्या पातळीवर जात आदिलवर केलेले आरोप चर्चेचा विषय झाला होता. यानंतर आदिल दुरानीनं देखील स्वतंत्रपणे पत्रकार परिषद घेत राखीला उत्तर दिले होते.

Fatima aka Rakhi in Raavan Avtar
Ganapath Movie Review : टायगरच्या माकडउड्यांचा 'फुसका गणपत', आजारी पडलेली कथा अन् बरचं काही!

राखी बिग बॉसमध्ये देखील चमकली होती. त्यावेळचा सीझन राखीनं लोकप्रिय केला होता. असे बोलले जाते. त्यातील अनेक स्पर्धकांना राखीनं नाकीनऊ आणले होते. पाचपैकी शेवटच्या तीन स्पर्धकांमध्ये राखी होती. यावरुन तिची लोकप्रियता लक्षात येईल. तेव्हाच्या सीझनचा टीआरपी कमी झाल्यानंतर राखीनं त्याला वेगळे वळण दिले होते.

Fatima aka Rakhi in Raavan Avtar
Tiger 3 Trailer Review : जे शाहरुख करतो तेच सलमानही करतोय, वेगळं काय आहे त्यात, 'टायगर ३' मध्ये नवीन काय असेल?

आता विरल भयानीनं सोशल मीडियावर राखीचा जो व्हिडिओ शेयर केला आहे त्यावर हजारो व्ह्युज आले आहेत. त्यात नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंट्समधून अनेकांनी राखीवर तोफ डागली आहे. दुसरीकडे कित्येकांनी तिच्या या व्हिडिओचे कौतुकही केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com