Rakhi Sawant, Rakesh Sawant , Adil Khan
Rakhi Sawant, Rakesh Sawant , Adil KhanGoogle

Rakhi Sawant: राखी सावंतच्या लग्नानं टेन्शनमध्ये आलाय भाऊ राकेश..म्हणाला..

राखी सावंतनं आदिल खानशी लग्न केल्यानंतर आपलं नाव फातिमा ठेवलं ज्याची भरपूर चर्चा रंगली. तसंच आता तिच्या प्रेगनन्सीची बातमीही व्हायरल होताना दिसत आहे.
Published on

Rakhi Sawant: बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या आपल्या लग्नामुळे मोठी चर्चेत आहे. राखीनं काही दिवसांपूर्वीच बॉयफ्रेंड आदिल खान सोबतचे वेडिंग फोटो शेअर करत सगळ्यांना हैराण करुन सोडलं. राखीच्या वेडिंग फोटोजनंतर तिचे मॅरेज सर्टिफिकेट व्हायरल झाले,ज्यावर तिचं नाव 'फातिमा' असं लिहिलेलं दिसलं.

बरं एवढंच नाही त्यासोबत खुलासा झाला की तिनं हे लग्न जवळपास ७ महिन्यापूर्वीच म्हणजे २०२२ मध्ये केलं होतं. यादरम्यान आता राखीचा भाऊ राकेशची प्रतिक्रिया समोर आली आहे. (Rakhi Sawant brother rakesh sawant reaction on her marriage)

Rakhi Sawant, Rakesh Sawant , Adil Khan
Bigg Boss 16: Top 3 मध्ये असतील 'हे' स्पर्धक, बोलता-बोलता सिमी ग्रेवालनी सांगून टाकली नावं...

राखी सावंतचा भाऊ राकेशला जेव्हा तिच्या नाव बदलण्याविषयी प्रश्न विचारला गेला तेव्हा तो म्हणाला, ''मला हे माहित नाही. ते तिचं वैयक्तिक आयु्ष्य आहे,पती-पत्नीमध्ये काय घडतं हे खूप पर्सनल आहे. आम्हाला माहित नाही,पण जर राखीनं नाव बदलण्याचा निर्णय घेतला असेल तर काहीतरी विचार करुन घेतला असेल''. पण आता राखीच्या चाहत्यांना मात्र तिनं खरंच नाव बदललं आहे का याविषयी जाणून घ्यायचं आहे.

Rakhi Sawant, Rakesh Sawant , Adil Khan
Pathaan: भर कार्यक्रमात जॉननं व्यक्त केली शाहरुखवरची नाराजी, किंग खानवर प्रश्न विचारताच म्हणाला..

राखीच्या सीक्रेट वेडिंगविषय़ी राकेश म्हणाला की,''आम्ही सगळे टेन्शनमध्ये आहोत. राखी आमच्या सगळ्यात लहान आहे आणि तिनं आयुष्यात खूप दूःख भोगलं आहे. बिग बॉसमध्ये मागच्या वेळेस रितेशने देखील तिचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला आणि ती पूर्णपणे तुटली. तेव्हा आम्हाला देखील धक्का बसला होता. त्यामुळे यावेळी राखीनं रितसर लग्न केलं''.

Rakhi Sawant, Rakesh Sawant , Adil Khan
Miss Univers 2022 विश्व सुंदरी! पाहा.. मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी झालेली दिविता राय आहे तरी कोण?

माहितीसाठी इथं सांगतो की राखी सावंतनं पहिलं लग्न रितेश राजसोबत केलं होतं. बिग बॉस १५ मध्ये तिनं आपलं हे मोठं सीक्रेट समोर आणलं होतं. रितेशपासून वेगळं झाल्यावर राखी सावंतने आता आदिल खानशी लग्न केलं आहे. आ्रता त्या लग्नावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Rakhi Sawant, Rakesh Sawant , Adil Khan
Miss Universe च्या मंचावर अवतरली भारताची 'गोल्डन बर्ड',दिविता रायवर खिळल्या जगाच्या नजरा...

आदिल आणि राखीचे फोटो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होताना दिसत आहेत. आणि यादरम्यान बातमी समोर येतेय की राखी सावंत प्रेग्नेंट आहे. राखी आता यावर रिअॅक्ट झाली आहे.

एका मुलाखतीत राखीला तिच्या प्रेग्नेंसीविषयी विचारले असता तिनं 'नो कमेंट्स' असं उत्तर दिलं. राखीच्या या उत्तरानं तिचे चाहते मात्र हैराण झाले आहेत. कारण राखीनं स्पष्ट नकारही दिलेला नाही.. ना राखीनं यावर होकाराची मोहोर उमटवलीय. पण राखी पुढच्या काही दिवसांत या बातमीवरही स्पष्टपणे बोलेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com