Bigg Boss Marathi 4: बिग बॉसमध्ये धुमाकूळ घालणारी राखी सावंत खरच मराठी आहे का? असा आहे तिचा भूतकाळ

राखी सावंतहिच्या आयुष्यातील न माहीत असलेल्या गोष्टी जाणून घ्या..
rakhi sawant past family background father mother career Bigg Boss Marathi 4
rakhi sawant past family background father mother career Bigg Boss Marathi 4sakal
Updated on

rakhi sawant: हिन्दी सह मराठी मनोरंजन विश्वात सतत चर्चेत असणारं आणि गाजलेलं नाव म्हणजे राखी सावंत. तिला कॉन्ट्रोवर्सी क्वीन म्हटले जाते. ती कुठेही जाते तिथे वाद होतो. ती कधी आपल्या नृत्यामुळे चर्चेत असते तर कधी आपल्या बॉयफ्रेंडवरुन बातम्यांचा विषय ठरते. अनेकवेळा ती राजकीय पक्षांनाही अंगावर घेते. रियालिटी शो बिग बॉसच्या घरातील एक महत्वाची सदस्य म्हणून तिची ओळख आहेच, पण राखी सावंत खरच मराठी आहे का? याची जरा माहिती घेऊया..

rakhi sawant past family background father mother career Bigg Boss Marathi 4
Bigg Boss Marathi 4: अपूर्वा जे बोलली ते करूनच दाखवलं.. बिग बॉसही म्हणाले.. यू आर..

सावंत आडनाव असुनही राखी सावंतला का मराठी बोलता येत नाही. असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचेच उत्तर आज पाहूया.. मुळात राखी सावंत हे तिचे खरे नाव नाही. तिचे मूळ नाव नीरू भेडा असे आहे. राखीच्या खरा वडिलांचे नाव माहीत नाही. पण तिची आई जया भेडा यांनी कॉन्स्टेबल आनंद सावंत यांच्याशी दुसरे लग्न केले आणि त्यानंतर राखीला दुसऱ्या वडिलांचे आडनाव मिळाले.

rakhi sawant past family background father mother career Bigg Boss Marathi 4
Deepika Padukone Birthday: लग्नानंतरही बिनधास्तपणे बोल्ड आणि इंटीमेट सीन देते दीपिका पदूकोण, कारण..

राखी सावंतचे दुसरे वडील हे मराठी कुटुंबातील. ते मुंबई पोलिस दलात कॉन्स्टेबल होते. त्यांचे नाव आनंद सावंत. तर राखीची आई गुजराती तिचे नाव माया भेडा. त्यामुळे राखीची कागदोपत्री सगळीकडे नीरु भेडा या नावानेच नोंद आहे. म्हणजे जेव्हा ती प्रसिद्ध झाली तोपर्यंत तिच्याकडे नीरु नावानेच पासपोर्ट होता. त्यामुळे राखी मराठी असली तरी तिला मराठी बोलता येत नाही.

राखीला तिच्या वडीला बदल नेहमी भिती असायची. ती म्हणाली होती. 'माझे वडील हिटलरसारखे होते. घरात अभिनय किंवा नृत्याचा काहीच संबंध नव्हता. वडिलांची दहशत होती. मी कधी ठरवले नव्हते की डान्सर व्हायचं किंवा अभिनेत्री व्हायचं. माझ्या आईला मात्र अभिनेत्री व्हायची खूप इच्छा होती. परंतु, परिस्थितीमुळे तिला आयाचे काम करावे लागले. जेवणाची पण आबाळ व्हायची. आई आम्हाला आमच्या चाळीतील घरात कुलूप लावून कामाला जायची.'

राखीने सांगितले होते- मला नेहमीच या इंडस्ट्रीचा भाग व्हायचे होते पण माझ्या वडिलांची इच्छा होती की मी लग्न करावे. म्हणून आई-वडिलांचे पैसे चोरून मी पळून गेले. घरातून पळून गेल्यानंतर कुटुंबाने माझ्याशी संबंध तोडले होते.

हेही वाचा- ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

2003 मध्ये ‘मोहब्बत है मिर्ची’ या गाण्याने त्याचे नशीब बदलले. चार वेळा ऑडिशन दिल्यानंतर हे गाणे तिला मिळाले. यानंतर राखी ‘मस्ती’ आणि ‘मैं हूं ना’ सारख्या चित्रपटांमध्येही छोट्या भूमिका करताना दिसली. आज राखीने  सतत लाइमलाइटमध्ये राहणं ही भल्याभल्यांना न जमणारी गोष्ट राखीनं सहज करून दाखवलीय. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com