King Khan Controversy: शाहरुखच्या त्या कृतीवर राखीची 'फुंकर'

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) हा सध्या चर्चेत आला आहे.
Rakhi Sawant And Shahrukh Khan
Rakhi Sawant And Shahrukh Khan

Bollywood News: बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) हा सध्या चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे लता दीदींच्या (Lata Didi) अंत्यसंस्काराच्या वेळी त्यानं केलेली कृती ही बरोबर होती की चूकीची यावरुन नेटकऱ्यांनी शाहरुखला धारेवर (Social Media News) धरले आहे. अंत्यविधीच्या (Lata Mangeshkar funeral) वेळचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये शाहरुख लता दीदींचं (Lata Mangeshkar News) अंतिम दर्शन घेऊन खाली आल्यानंतर थुंकताना दिसत आहे. त्या व्हिडिओवरुन शाहरुखला ट्रोल करण्य़ात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून शाहरुखवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

शिवसेनेच्या नेत्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी देखील शाहरुख खानच्या बाजुनं बोलताना नेटकऱ्यांना झापलं होतं. वेळ काय, प्रसंग काय, आपण काय बोलतो आहोत, एखाद्या धार्मिक कृतीला कशा पद्धतीनं वेगळा रंग दिला जात असल्याची प्रतिक्रिया मातोंडकर यांनी दिली आहे. यासगळ्या प्रकरणावर आता अभिनेत्री राखी सावंतनं देखील शाहरुखची पाठराखण केली आहे. तिनं शाहरुखला नावं ठेवणाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढलीय. जे कुणी शाहरुखला बोल लावत आहेत त्यांनी जरा संयम ठेवावा. उगीच चुकीची माहिती शेयर करु नये. असे राखीनं म्हटलं आहे.

राखी सावंतनं नेटकऱ्यांना झापलं आहे. तिनं लिहिलं आहे की, अशा लोकांना लाज वाटायला हवी ज्यांनी शाहरुखला त्या कृतीवरुन ट्रोल केले आहे. आपण काय बोलतो याची लोकांना जराही जाण नाही. याचे विशेष वाटते. शाहरुखनं जे काही केलं त्याला दुवा मागितली असं म्हटलं जातं. पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर राखी सावंतनं सांगितलं की, जेव्हा कुणी दुवा मागतं तेव्हा फुंकर मारली जाते. तो काही थुंकला नाही. तुम्ही कोणी शाहरुखला जे बोलत आहात ते चूकीचे आहे. तो एक मोठा स्टार आहे. भारताचा आयडियल कलाकार आहे. त्याच्याबाबत असं होणं हे चूकीचं आहे.

Rakhi Sawant And Shahrukh Khan
Lata Mangeshkar: आजींसाठी श्रद्धा कपूरची भावनिक पोस्ट!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com