Raksha Bandhan movie: 'सावळा रंग कमी पैसे, गोरा रंग जास्त पैसे...' | actress Smrithi Srikanth share black vs fairness controversy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raksha Bandhan movie actress Smrithi Srikanth

Raksha Bandhan movie: 'सावळा रंग कमी पैसे, गोरा रंग जास्त पैसे...'

Boycott Rakshabandhan Movie: भलेही अक्षय कुमारचा रक्षांबंधन हा बॉक्स ऑफिसवर प्रभावी कामगिरी करताना दिसत नसला तरी त्याच्या स्टारकास्टनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड आणि बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांवर बहिष्कार टाकावा अशी मागणी नेटकऱ्यांकडून (Bollywood News) केली जात आहे. अर्थात याला त्या सेलिब्रेटींची पूर्वीची काही मुलाखतींमधून केलेली वक्तव्ये देखील जबाबदार आहे. सध्या आमिर खानचा लाल (Laal Singh Chaddha News) सिंग चढ्ढा आणि अक्षयचा रक्षाबंधन हे दोन्ही चित्रपट नेटकऱ्यांच्या रडारवर आहे. जेव्हापासून आमिरच्या लाल सिंगचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता तेव्हापासून त्याचा चित्रपट चर्चेत होती. तिच गत रक्षाबंधनची देखील होती.

आता रक्षाबंधनमधील अभिनेत्री स्मृती श्रीकांतनं एका मुलाखतीमध्ये जे विधान केलं आहे त्यामुळे ती चर्चेत आली आहे. तिनं बॉलीवूडमध्ये रंगभेद कशाप्रकारे केला जातो. काळं आणि गोर असा भेदभाव केला जातो हे तिच्या उदाहरणावरुन पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. स्मृतीनं तिला दिलं जाणारं मानधन हे कमी होतं. त्याचे कारण ती एक सावळी अभिनेत्री होती. असं तिचं म्हणणं आहे. बॉलीवूडमध्ये असे प्रकार होताना दिसतात. मात्र त्याविषयी कुणीही समोर येऊन बोलण्याचे धाडस करत नाही. अशी तक्रार तिनं केली आहे.

स्मृतीच्या त्या वक्तव्यानं मात्र अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अक्षय कुमारच्या रक्षाबंधनमध्ये दिल्लीच्या स्मृतीनं भूमिका साकारली आहे. तिच्या अभिनयाचे कौतूकही होत आहे. तिनं अक्षयच्या बहिणीची भूमिका केली असून त्यात तिचे नाव लक्ष्मी असे आहे. स्मृतीनं हिंदूस्थान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, आजच्या शतकात देखील आपल्याला रंगभेदाला सामोरं जावं लागतं. ही शरमेची गोष्ट आहे. असा प्रकार माझ्यासोबत घडला आहे. मला मिळणारं मानधन आणि माझ्याहून गोऱ्या रंगाच्या अभिनेत्रीला मिळणारं मानधन यात फरक होता. असं धक्कादायक विधान स्मृतीनं केलं आहे.

मला लहानपणापासून माझ्या दिसण्यावरुन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. दिसणं आपल्याकडे एवढं महत्वाचं आहे की त्यामुळे आपण बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतो असे स्मृतीचे म्हणणे आहे. आपल्याकडे रंगावरुन जी मानसिकता आहे ती कायम आहे. त्यात बदल व्हायला हवा. अशी अपेक्षा स्मृतीनं यावेळी बोलून दाखवली आहे. आनंद एल राय दिग्दर्शित रक्षाबंधनमध्ये एक भाऊ चार बहिणी यांच्या अतुट बंधनाची मोठी गोष्ट दाखवण्यात आली आहे. त्याला प्रेक्षकांचा मात्र जेमतेम प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.