
Ram Charan: विराट कोहलीच्या बायोपिकमध्ये राम चरण दिसणार?
सध्या मनोरंजन विश्वात साउथ इंडस्ट्रीची हवा आहे. ऑस्कर 2023 मध्ये नाटू नाटू ला पुरस्कार मिळाल्यानंतर सर्वच भारतीयांची मान गर्वाने उंचावली आहे. आरआरआरच्या सर्व टिमवर चारही बाजूने कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रेम रक्षित याने कोरिओग्राफ केलेले हे काळ भैरव आणि सिपलीगुंज यांनी गायलेले गाणे ज्याला संगीत एमएम कीरावानी यांनी दिले आहे.
आरआरआरमधील नाटू नाटू ऑस्करमध्ये चांगलाच गाजला होता. या गाण्याने केवळ ऑस्कर जिंकला नाही तर जगभरात धुमाकूळ घातला. दरम्यान, राम चरणने सांगितले की, त्याला कोणत्या क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल.
ऑस्कर जिंकल्यानंतर राम चरण इंडिया टुडे कॉन्क्लेव्हच्या मंचावर दिसला. यावेळी त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले. ज्यांची त्याने उत्तरेही दिली. ऑस्करच्या मंचावर त्याने नाटू नाटूवर डान्स का केला नाही असा प्रश्नही त्याला विचारण्यात आला होता. यावेळी तो म्हणाला की, त्याला स्वतः या गाण्यावर ऑस्करमध्ये डान्स करायचा होता. मात्र ऑस्कर समितीने त्याच्याशी संपर्क साधला नाही. मात्र तरीही त्या मंचावर त्याचे गाणे सादर झाल्याचा त्याला खुप आनंद आहे.
राम चरणला कोणती भुमिका करण्यास आवडेल अस विचारण्यात आलं त्यावेळी खूप विचार केल्यानंतर राम चरणने सांगितले की, त्याला स्पोर्ट्स फिल्म करायला आवडेल. त्याला त्यात जास्त रस आहे.
या विषयी बोलतांना तो म्हणतो की, मला खूप दिवसांपासून स्पोर्ट्स फिल्म करायची इच्छा होती. पण ती अजून पुर्ण झालेली नाही. यावर जेव्हा त्याला विचारण्यात आले की जर विराट कोहलीवर बायोपिक बनवला गेला तर त्याला ही ती भूमिका करायला आवडेल का? यावर त्याने पटकन होकार दिला.
तर दुसरीकडे विराट कोहलीवरही नाटू नाटू ची क्रेझ पाहयला मिळाली होती. अलीकडेच त्यांचा डान्स व्हिडिओही व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडिओमध्ये तो खेळाच्या मैदानात RRR च्या नाटू नाटूवर नाचताना दिसला होता. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.