'वाद नाही पण त्याच्याबरोबर काम नको'

त्यानंतर तो दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरला.
anurag kashyap and ram gopal varma
anurag kashyap and ram gopal varmaTeam esakal

मुंबई - बॉलीवूडमधील प्रसिध्द दिग्दर्शक म्हणून अनुराग कश्यपचे (anurag kashyap ) नाव घ्यावे लागेल. प्रख्यात दिग्दर्शक आणि निर्माता राम गोपाल वर्मा (ram gopal varma ) याच्या सत्या चित्रपटातून पटकथाकार म्हणून अनुरागनं सुरुवात केली होती. त्यानंतर तो दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरला. तो उत्तम अभिनेताही आहे. त्यानं काही चित्रपटांमध्ये कामही केले आहे. राम गोपाल वर्माच्या सत्या पासून अनुरागनं पुन्हा त्याच्याबरोबर काही काम केलं नाही. या दोन्ही दिग्दर्शकांच्या चाहत्यांना हा कायम पडलेला प्रश्न आहे. त्यावर राम गोपाल वर्मानं उत्तर दिलं आहे. एकेकाळी हे दोघेही चांगले मित्र होते. (ram gopal varma wont work again with anurag kashyap says )

अनुराग (anurag kashyap ) आणि राम गोपाल वर्मा (ram gopal varma ) हे दोघेही बॉलीवूडमधील मोठे दिग्दर्शक आहेत. 1998 मध्ये राम गोपाल वर्माबरोबर त्यानं सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले होते. त्यानंतर त्यांनी एकत्र काम केले नाही. यावर राम गोपाल वर्माचे असे म्हणणे आहे की, मला त्याच्याबरोबर पुन्हा काम करायचे नाही. राम गोपाल वर्मा यांची अनुराग बरोबर कुठलाही वाद नाही. मात्र त्यांची केमिस्ट्री जुळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा एकत्र काम करु शकणार नसल्याचे त्यांचे मत आहे.

बॉलीवूड हंगामा बरोबर बोलताना राम गोपाल वर्मा यांनी सांगितले, मी का अनुराग यांच्याबरोबर काम करु हा माझा प्रश्न आहे. मला त्याच्या बरोबर काम करायला काही अडचण नाही. मात्र तसे होणार नाही. त्यानं त्याचं करिअर आता तयार केले आहे. तो लिहितो आहे. त्यामुळे आमच्या एकत्र येण्याचे काही कारण नाही. आणि कुठलीही दोन माणसं एका गोष्टीकडे सारख्याच दृष्टीकोनातून पाहू शकत नाही. ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल.

anurag kashyap and ram gopal varma
वैमानिक अभिनव चौधरी यांच्याऐवजी अभिनेत्याला वाहिली श्रद्धांजली
anurag kashyap and ram gopal varma
Amruta Subhash : 'निर्माते माझ्याकडे अभिनेत्री म्हणून पाहत नाहीत'

अनुराग आणि राम गोपाल वर्मा हे दोन्ही दिग्दर्शक सोशल मीडियावर अॅक्टिव्ह (social media) असणारे सेलिब्रेटी आहेत. ते कायम चर्चेत असणारी व्यक्तिमत्वं आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी राम गोपाल वर्मा यांनी कोरोनाची वाढती आकड़ेवारी पाहून मोदी सरकारवर टीका केली होती. त्यामुळे ते चर्चेत आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com