Ranbir Alia wedding : अखेर रणबीर आलियाचे गणेश पूजन, मेहंदी पार पडली..

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. या लग्नाबाबत अत्यंत गोपनीयता पाळली जात आहेत. आज रणबीरआलियाचे गणेशपूजन आणि मेहंदीचा कार्यक्रम पार पडला आहे तर उद्या...
ranbir and alia
ranbir and aliasakal

रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) यांचे लग्न जणू जागतिक सोहळाच झाला आहे, जिथे तिथे त्यांच्या लग्नाच्याच चर्चा आहेत. हे लग्न १५ किंवा १६ एप्रिल रोजी होणार असल्याची चर्चा आहे. याबाबत अधिकृत माहिती कुटुंबीयांनी अजून उघड केलेली नाही. परंतु या लग्नाची तयारी मात्र जोरदार सुरु झालीआहे. दिवसेंदिवस त्याबाबत अधिक माहिती समोर येत आहेत. आज सकाळपासून वऱ्हाडी मंडळींचा राबता वाढला असून रणबीरच्या वांद्रे येथील घरात पाहुणे येत आहेत.

ranbir and alia
Ranbir Alia wedding : कर्मचाऱ्यांच्या फोनवर स्टिकर; फोटो लीक...

सध्या त्यांच्या लग्नाच्या ठिकाणी आणि वांद्रे येथील 'वास्तू' बंगला इथे रोषणाई, सजावट, खानपान यांची जय्यत तयारी सुरु आहे. या लग्नात सुरक्षिततेचीही तितकीच काळजी घेतली जात आहे. या पूर्वतयारीसाठी आता अनेक कामगार, कर्मचारी, सुरक्षारक्षक येऊ लागले आहेत. तर पाहुण्यांची ये-जा ही वाढली आहे. माध्यमांना मात्र का सोहळ्यापासून पूर्ण लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असले तरी लग्नातील प्रत्येक घडामोडीचा तपशील माध्यमांना मिळतो आहे.

ranbir and alia
Ranbir Alia Wedding:विवाहस्थळी पोलिस अन् मीडियात बाचाबाची; काय घडलं नेमकं?

रणबीर आलियाचा लग्न सोहळा हा या वर्षातील सर्वात मोठा विवाहसोहळा असून जगभरातील चाहत्यांचे त्याकडे लक्ष लागून राहिले आहे. त्यांचे लग्न कधी होणार, कसे होणार याविषयी केवळ अंदाज बांधले जात आहेत. परंतु आता सूत्रांनी काहीशी खात्रीशीर माहिती दिली आहे. रणबीर आणि आलीया यांच्या विवाह सोहळ्याला आजपासून सुरवात झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (आज) सकाळी ११ वाजता रणबीर आणि आलियाचा लग्नाआधी केला जाणारा गणेशपूजन विधी पार पडला. या सोहळ्याला केवळ घरातील काही मंडळी उपस्थिती होती. आता वऱ्हाडी मंडळीत वाढ होत असून दुपारी २ नंतर मेहंदीचा कार्यक्रम सुरु होणार आहे. (ranbir alia wedding, mehandi) या सोहळ्यात कपूर आणि भट कुटुंबीय एकत्र असल्याचेही बोलले जात आहेत. १४ एप्रिलला संगीत आहे. या दिवशी रणबीर आणि आलियाचे मित्र मैत्रिणी, काही जवळचे कलाकार हजेरी लावणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com