'रणबीर - आलिया'चा मुहूर्त ठरला, लग्नाबाबत कुटुंबीयांकडून खास माहिती... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ranbir kapoor and alia bhatta

'रणबीर - आलिया'चा मुहूर्त ठरला, लग्नाबाबत कुटुंबीयांकडून खास माहिती..

entertainment news : रणबीर कपूर (ranbir kapoor) आणि आलिया भट्ट (alia bhatt) ही सर्वात लोकप्रिय जोडी मानली जाते. त्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. नुकतेच त्यांचे चित्रीकरणा दरम्यानचे फोटो व्हायरल झाले असून चाहत्यांनी त्यांच्या एकत्रित असण्याबद्दल प्रेम व्यक्त केले आहे. गेल्या काही वर्षात त्यांच्या प्रेमाबद्दल अनेक चर्चा होत होत्या. पण आता मात्र हे प्रकरण लग्नापर्यंत येऊन पोहोचले आहे. रणबीर आणि आलिया लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा: ११ लाखांची पैठणी जिंकण्यासाठी तयार ना? काय आहे खासियत?

काहींनी तर ते येणाऱ्या एप्रिल महिन्यात लग्न करतील अशी अफवा पसरवली होती. परंतु त्यांच्या लग्नाविषयी आता थेट त्यांच्या कुटुंबीयांनीच स्पष्टता दिली आहे. रणबीरची आत्या रिमा कपूर जैन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही हे लग्न होणार असल्याचे म्हंटले आहे. परंतु त्यांनी याबाबत सूचक विधान केले आहे. रणबीर आणि आलिया एप्रिलमध्ये लग्न करणार असल्याच्या अफवा खऱ्या आहेत का असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, 'मला अद्याप काहीही माहिती नाही. ते लग्न करतील पण कधी ते मला माहित नाही. ते ठरवतील आणि मग तुम्हा सर्वांना कळेलच,'.

हेही वाचा: nawazuddin siddiqui : नवाझुद्दीन सिद्दीकीवर का आली लोकलने फिरण्याची वेळ..

पुढे त्या म्हणाल्या, 'अजून आम्ही कसलीही तयारी केलेली नाही. त्यामुळे इतक्या लवकर लग्न कसे होईल. तसे झाले तर ते माझ्यासाठी पण धक्काच असेल. ते नक्कीच लग्न करतील पण कधी ते माहित नाही.' रणबीर आणि आलीय आजवर कधीही त्यांच्या नात्याबद्दल खुलेपणाने व्यक्त झाले नाहीत. त्यामुळे अनेकांपुढे त्यांचे नाते हा मोठा संभ्रम आहे. पण रीमा जैन यांच्याशी बोलल्या नंतर रणबीर आणि आलीय हे लग्न करणार हे निश्चित झाले आहे. पण आता त्याला कधी मुहूर्त मिळतोय याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Ranbir Kapoor And Aliya Bhatt

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..