पाकिस्तानी सिनेमात काम करायचंय म्हणालेला रणबीर..प्रकरण गळ्याशी येताच म्हणाला कसा..Ranbir Kapoor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranbir Kapoor

Ranbir Kapoor: पाकिस्तानी सिनेमात काम करायचंय म्हणालेला रणबीर..प्रकरण गळ्याशी येताच म्हणाला कसा..

Ranbir Kapoor: बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या 'तू झूठी मै मक्कार' सिनेमामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता आपल्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी चंदिगढला पोहोचला होता,जिथं त्यानं एक वादग्रस्त विधान केलं अन् गोत्यात आला.

प्रमोशन दरम्यान मीडियाशी संवाद साधताना रणबीरनं पाकिस्तानी सिनेमांत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पण त्यानंतर प्रकरण गळ्याशी येतंय हे पाहताच त्यानं लागलीच यावर स्पष्टिकरण देणारं एक निवेदन जारी केलं.

त्यानं त्यात म्हटलंय,''मला वाटतं मी जे बोललो त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला''.(Ranbir Kapoor clarifies his statement want to work in pakistani movie)

रणबीरला जेव्हा त्याच्या या वादग्रस्त विधानाविषयी विचारलं गेलं तेव्हा अभिनेत्यानं खूप समजूतदारपणे याचं उत्तर दिलं. तो म्हणाला, ''मला वाटतं की माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. मी एका फिल्म फेस्टिव्हलमध्ये होतो. जिथे खूप सारे पाकिस्तानी फिल्म मेकर्स मला प्रश्न विचारत होते..जर तुझ्याकडे एखादी चांगली स्टोरी आम्ही आणली तर तू काम करशील का?''

''तेव्हा त्यांना नाही बोलून मला कोणताही वाद त्याप्रसंगी ओढवून घ्यायचा नव्हता म्हणून मी हो बोललो. पण सिनेमा हा शेवटी सिनेमा असतो. कला असते ती. मी 'ए दिल है मुश्किल' सिनेमात पाकिस्तानी अभिनेता फवाद खानसोबत काम केले आहे. फवाद व्यतिरिक्त आपल्या निवेदनात रणबीरनं प्रसिद्ध पाकिस्तानी गायक आतिफ असलमचं नाव घेत त्याची प्रशंसा केली''.

रणबीर पुढे म्हणाला, ''मी पाकिस्तानच्या बऱ्याच कलाकारांना ओळखतो. राहत फतेह अली खान आणि आतिफ असलम खूप चांगले गायक आहेत,ज्यांनी हिंदी सिनेमासाठी कामही केलं आहे..त्यामुळे सिनेमा हा सिनेमा आहे..तो देशाच्या सीमा पाहत नाही. पण एक गोष्ट नक्कीच सांगेन की कोणतीही कला तुमच्या देशापेक्षा मोठी नसते''.

''म्हणूनच,तुमच्या देशासोबत ज्याचे चांगले संबंध नाहीत..त्यावेळी तुमची पहिली प्राइऑरिटी नेहमी तुमच्या देशाला असायला हवी''.

रणबीर कपूरचं हे निवेदन सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसंच,नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

रणबीरचा येणाऱ्या आगामी सिनेमात श्रद्धा कपूरसोबत पहिल्यांदाच रोमान्स करताना दिसणार आहे. हा सिनेमा रिलीजसाठी तयार आहे. 'तू झूठी, मै मक्कार' ८ मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.

चाहते देखील रणबीर आणि श्रद्धाच्या या सिनेमाला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आता या दोघांची केमिस्ट्री किती जुळून आलीय याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.