'लग्नानंतर रणबीरला आवडू लागलाय वरण-भात'; आलियाविषयीही केलं मोठं वक्तव्य Ranbir Kapoor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranbir Kapoor On Marrying Alia Bhatt: "Used To Say Shaadi Is Like Dal Chawal. Now..."

'लग्नानंतर रणबीरला आवडू लागलाय वरण-भात'; आलियाविषयीही केलं मोठं वक्तव्य

बॉलीवूडचा हॅन्डसम हंक रणबीर कपूर 2022 मध्ये जरा जास्तच चर्चेत आलेला दिसून आला आहे. रणबीर कपूर(Ranbir Kapoor)च्या दोन मोठ्या सिनेमांना प्रदर्शनाआधीच लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळत आहे,हे पाहून तरी रणबीर बॉक्सऑफिसचा या वर्षातला किंग म्हणून स्वतःला सिद्ध करेल असं चित्र सध्या तरी निर्माण झालेलं आहे. आज रणबीरचा आणखी एक ट्रेलर रिलीज झाला आहे. 'शमशेरा'च्या ट्रेलरमुळे सध्या सगळीकडे रणबीरचीच चर्चा आहे.(Ranbir Kapoor On Marrying Alia Bhatt: "Used To Say Shaadi Is Like Dal Chawal. Now...)

हेही वाचा: 'राम तेरी गंगा मैली' ची मंदाकिनी परत येतेय; धमाकेदार एन्ट्रीनं वेधणार लक्ष

'शमशेरा' च्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात रणबीर कपूरने मीडियासोबत मनमोकळा संवाद साधला. अभिनेत्यानं 'शमशेरा' सिनेमा व्यतिरिक्त आपलं लग्न आणि पत्नी आलिया भट्ट विषयी देखील अनेक गोष्टी शेअर केल्या. रणबीरने आलियाची मनापासून प्रशंसा केली. यावेळी आपलं आलियावर किती प्रेम आहे आणि लग्नानंतर नेमकं आपल्याला आयुष्यात किती मोठी गोष्ट गवसली आहे याविषयी वक्तव्य केलं आहे.

हेही वाचा: स्वरा भास्कर-रणवीर शौरेत काय बिनसलं? अभिनेत्यानं रागात उचललं 'हे' पाऊल...

रणबीरने आलियाला आपली 'दाल-चावल' म्हणताना सांगितलं आहे की,''हे वर्ष माझ्यासाठी खूप चांगलं राहिलं. या वर्षी सिनेमा रिलीज होण्यासोबतच माझं लग्न देखील झालं, जी माझ्या आयुष्यात घडलेली खूप सुंदर गोष्ट आहे. मी नेहमी सिनेमात सांगायचो की लग्न वरण-भातासारखं आहे. जीवनात थोडं तंगडी कबाब,खीमा पाव,हक्का नूडल्स असायला हवं. पण आयुष्यात आलेल्या अनुभवावरुन मला आता वरण-भात हेच बेस्ट वाटत आहे आणि बाकी काहीच नाही. आलिया दाल-चावल वर दिला जाणारा तडका आहे,आंबट-गोड लोणच्यासारखी आहे,कांदा आहे,सगळंच आहे ती''.

हेही वाचा: जॉन अब्राहम म्हणाला,'चित्रपट करुन मला पैसा कमवायचा नाही तर...'

आता रणबीर कपूरचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर आलिया भट्टचा आनंद गगनात मावेनासा होईल हे मात्र निश्चित. रणबीरच्या या वक्तव्यामुळं आलियाचं त्याच्या आयुष्यात किती महत्त्वाचं स्थान आहे हे मात्र नक्की कळलं आहे. रणबीर-आलिया बी-टाऊनचे मोस्ट ट्रेंडिंग कपल्स आहेत. दोघांनी याच वर्षी लग्न देखील केलं आहे. त्यांचं लग्न अगदी मोजक्याच मित्र-परिवार आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत झालं आहे. लग्नाच्या पेहरावात दोघं अगदी मेड फॉर इच अदर असे शोभून दिसले. दोघांची जोडी रिअल लाइफमध्ये हिटही ठरली. रणबीर-आलिया दोघंही सध्या आपापल्या आगामी प्रोजेक्टसमध्ये बिझी आहेत,त्यामुळे अद्याप हनीमूनलाही ते कुठे गेलेले दिसत नाहीत.

हेही वाचा: तारक मेहता का उल्टा चष्मा: अभिनेत्रीनं केली निर्मात्यांची पोलखोल; म्हणाली..

रणबीर-आलियाला पहिल्यांदा त्यांचे चाहते 'ब्रह्मास्त्र' या सिनेमाच्या माध्यमातून ऑनस्क्रीन एकत्र पाहणार आहेत. तेव्हा पहायचं की रियल लाइफमध्ये हिट झालेली ही जोडी रिल लाइफमध्ये मोठ्या पडद्यावर काय कमाल करते ते.

Web Title: Ranbir Kapoor On Marrying Alia Bhatt Used To Say Shaadi Is Like Dal Chawal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top