Brahmastra:'सिनेमा चालला नाही की समजून जायचं...'; रणबीर कपूर स्पष्टच बोलला Ranbir Kapoor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranbir Kapoor Opens Up on Boycott Brahmastra Trend

Brahmastra:'सिनेमा चालला नाही की समजून जायचं...'; रणबीर कपूर स्पष्टच बोलला

Ranbir Kapoor: बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ब्रह्मास्त्र(Brahmastra) सिनेमा लवकरच रिलीजच्या वाटेवर आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा ब्रह्मास्त्र ९ सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे. पण सिनेमाविषयी लोकांमध्ये मात्र राग दिसून येतोय. सिनेमासंदर्भात नकारात्मक प्रचार केला जात आहे. अजूनही काही लोकांचे आलिया(Alia Bhatt) आणि रणबीरच्या(Ranbir Kapoor) सिनेमाविरोधात बॉयकॉट ब्रह्मास्त्र ट्रेंड सुरूच आहे.(Ranbir Kapoor Opens Up on Boycott Brahmastra Trend)

हेही वाचा: 'लाइगर'चा दिग्दर्शक पुरी जगन्नाथ अडचणीत, सोडावं लागलं मुंबईतलं आलिशान घर

ब्रह्मास्त्र मध्ये मुख्य भूमिका साकारलेल्या रणबीर कपूरनं एका कार्यक्रमात सिनेमाविषयी सुरू असलेला नकारात्मक प्रचार आणि बॉयकॉट ट्रेन्डवर आपलं मत मांडलं आहे. दिल्लीत मीडियासोबत बोलताना रणबीर म्हणाला आहे की, फक्त महत्त्वाचं आहे ते सिनेमाचं कथानक. ते चांगलं हवं.

बॉयकॉट ट्रेन्डवर बोलताना रणबीर म्हणाला की-''मी स्वतःचं उदाहरण देईन याबाबतीत. काही आठवडे आधी माझा 'शमशेरा' सिनेमा रिलीज झाला होता. मी त्यावेळी माझ्या सिनेमाविरोधात कोणतीच नकारात्मकता अनुभवली नव्हती.,पण तरी देखील सिनेमा बॉक्सऑफिसवर चालला नाही,कारण प्रेक्षकांना सिनेमा आवडला नाही. शेवटी सिनेमाचं कथानक महत्त्वाचं आहे. जर तुम्ही चांगला सिनेमा लोकांसमोर ठेवलात,त्याचं कथानक दमदार असेल तर लोकांचं मनोरंजन करण्यात तो कुठेच मागे पडणार नाही''.

हेही वाचा: 'ब्रह्मास्त्र'ला बॉयकॉट करणाऱ्यांवर भडकलेल्या स्वराची जीभ घसरली;म्हणाली,'धंदा...'

रणबीर कपूर पुढे म्हणाला की,''सिनेमा पाहणं, वेगळा एक्सपीरियन्स घेणं,त्यातील भावनांना अनुभवणं, स्वतःचं मनोरंजन करुन घ्यायला कोणाला आवडणार नाही? सिनेमातील प्रसंगांशी स्वतःच्या आयुष्याला जोडून हसायला-रडायला सगळ्यांनाच आवडतं. जर एखादा सिनेमा चालत नाही तर त्याचा अर्थ हाच आहे की ,सिनेमाच्या कथानकात दम नव्हता आणि हेच एकमेव त्याचं उत्तर आहे''.

हेही वाचा: Koffee With Karan7: 'कोणामुळे झालं ब्रेकअप?', अखेर ईशान खट्टरने सोडलं मौन

'ब्रह्मास्त्र' २०२२ मधला सर्वात मोठं बजेट असलेला सिनेमा म्हटला जात आहे. रणबीर आणि आलियासाठी हा सिनेमा खूप खास आहे. कारण दोघांनी पहिल्यांदाच या सिनेमाच्या माध्यमातून एकत्र काम केलं आहे. रुपेरी पडद्यावर आलिया-रणबीरची केमिस्ट्री पहायला त्यांचे चाहतेही उत्सुक आहेत. सिनेमा ९ सप्टेंबरला रिलीज होत आहे तरी सिनेमाविरोधात बॉयकॉट ट्रेन्ड सुरुच आहे. पण आलिया-रणबीरनं याचा विचार न करता सगळीकडे प्रत्यक्ष जाऊन दमदार प्रमोशन केलं आहे. सिनेमाचं Advance Booking ही चांगले झाले आहे. आता पहायचं प्रेक्षक बॉक्सऑफिसवर सिनेमाला कसा प्रतिसाद देतायत ते.

I

Web Title: Ranbir Kapoor Opens Up On Boycott Brahmastra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..