Ramayan Movie : रामाच्या भूमिकेसाठी रणबीरची खास 'शिकवणी', कशी सुरुयं तयारी?

दिग्दर्शक नितेश तिवारीनं रणबीरसाठी खास तयारी केली आहे.त्यानं त्याला खास ट्रेनिंग दिलं आहे.
Ranbir Kapoor to work on his voice and diction
Ranbir Kapoor to work on his voice and diction Sakal

Ranbir Kapoor to work on his voice and diction : अभिनेता रणबीर कपूर हा दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या रामायणावर आधारित चित्रपटामध्ये (Nitesh Tiwari Ramayan Movie) प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तो श्रीरामाची भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर सीतेच्या भूमिकेसाठी साऊथच्या साई पल्लवीचं (Sai Pallavi) नाव समोर आले आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितेश तिवारी यांनी रणबीर (Ranbir Kapoor ) कपूरसाठी रामायणातल्या त्या प्रमुख भूमिकेसाठी खास ट्रेनिंगचे आयोजन केले आहे. त्यामध्ये त्यानं वेगवेगळ्या प्रकारची तयारी रणबीरकडून करुन घेतल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून रणबीरच्या अॅनिमल या चित्रपटानंतर त्याच्या रामायणावर आधारित चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रणबीरचा अॅनिमल नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला (ranbir kapoor animal movie) होता. त्यात रणबीरनं महत्वाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला. त्यानं आठशे कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याचे दिसून आले. त्यानंतर आता रणबीरचा रामायण नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्यात तो श्रीराम यांची भूमिका साकारणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नितेश तिवारी यांच्या टीमनं रणबीरसाठी खास वेगळ्या डायलॉग टीमची निर्मिती केली आहे.

त्या डिपार्टमेंटमधील व्यक्ती रणबीरच्या संवादफेकवर काम करत आहेत. रामायण या चित्रपटामध्ये रणबीर कशा प्रकारे बोलणार याकडे खास लक्ष दिले जात आहे. सीतेच्या भूमिकेसाठी कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागणार याबाबत चर्चा सुरु आहे.कारण या अगोदर साऊथमधील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार होती. मात्र जान्हवी कपूरचे नाव घेतले जात आहे.

Ranbir Kapoor to work on his voice and diction
Ranbir Kapoor : 'कामाचे तास फिक्स पाहिजे, सेटवर शिस्त हवी अन्...' भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर' साठी रणबीरच्या काय आहेत अटी?

चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात होण्यापूर्वी रणबीरला त्याचा होमवर्क पूर्ण करायचा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी तो मोठी मेहनत करत आहे. इंडिया टुडेनं दिलेल्या एका वृत्तानुसार नितेश तिवारी यांची एक टीम रणबीरच्या डायलॉग डिलिव्हरीवर काम करत आहे. तसेच रामायणामध्ये जी वेशभूषा आहे त्यावर देखील रिसर्चपर काम सुरु आहे.

असं म्हटलं जात आहे की, नितेश तिवारी हे एक प्रभावी दिग्दर्शक असून त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटामध्ये कोणतीही कसर राहू नये म्हणून खूपच बारकाईनं तयारी सुरु केली आहे. चित्रपटातील वेगवेगळी पात्रं, त्यांची भूमिका, याविषयी अधिक अभ्यास केला जात आहे. रणबीर कित्येक तास मेहनत करत असून तो त्याच्या आवाजातील रेकॉर्डिंग नितेश तिवारीला पाठवत असल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com