आलियासोबत बेड शेअर करताना रणबीरला सहन करावी लागते 'ही' गोष्ट,म्हणाला झोपल्यावर ती... Ranbir kapoor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranbir Kapoor reveals how he tolerates Alia Bhatt's sleeping positions

आलियासोबत बेड शेअर करताना रणबीरला सहन करावी लागते 'ही' गोष्ट,म्हणाला झोपल्यावर ती...

Ranbir Kapoor: बॉलीवूडमधील सध्या चांगलं चर्चेत असलेलं क्यूट कपल म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट. लवकरच रणबीर आणि आलियाच्या घरी एक छोटा पाहुणा येणार आहे. दोघेही लवकरच आई बाबा होणार आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणबीरने आलियाच्या एका सवयीबद्दल सांगितलं आहे. ज्या सवयीमुळे त्याचं झोपणं मुश्किल झालंय .आलियासोबत बेड शेअर करताना त्याला मोठा संघर्ष करावा लागत असल्याचं तो म्हणाला. (Ranbir Kapoor reveals how he tolerates Alia Bhatt's sleeping positions)

हेही वाचा: शाहरुखच्या शर्टलेस फोटोची बायकोनेच उडवली खिल्ली, चाहत्यांची तर हसून पुरती वाट...

बॉलीवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत रणबीर कपूरला आलियाच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही सवयींबद्दल विचारण्यात आलं होतं. यावेळी आलिया तिच्या प्रत्येक कामात हुशार आहे अशी चांगली सवय त्याने सांगितली. तर आलियाची एक अशी सवय जी रणबीरला सहन करावी लागते याबद्दलही त्यांने खुलासा केला. तो म्हणाला "जेव्हा ती झोपते तेव्हा ती हळूहळू तिरकी फिरू लागते आणि मग काही वेळाने तुमच्या लक्षात येतं की पलंगावरची तुमची जागा कमी कमी होत चालली आहे. तिचं डोकं एकीकडे असतं तर पाय भलतीकडेच असतात आणि मी पलंगाच्या एका कोपऱ्यात जागेसाठी संघर्ष करत असतो."

तर रणबीर कपूरच्या सवयींबद्दल आलिया म्हणाली "रणबीरबद्दल मला एक गोष्ट आवडते ती म्हणजे त्याचं मौन. तो एक चांगला श्रोता आहे. मात्र त्याची हीच गोष्ट कधीकधी मला खटकते. म्हणजे कधीतरी त्यानेही काहीतरी बोलावं असं वाटतं मात्र तो काहीच प्रतिक्रिया देत नाही."

हेही वाचा: 'माझ्या मनातल्या देव्हाऱ्यात...'; सोनालीची नवरात्रीनिमित्तानं आजीसाठी भावूक पोस्ट

एप्रिल 2022 ला आलिया आणि रणबीर विवाहबंधनात अडकले. त्यानंतर दोन महिन्यातच आलियाने एक फोटो शेअर करत चाहत्यांना ती आई होणार असल्याची गुड न्यूज दिली.

हेही वाचा: रश्मिकाला पडली उर्फीची भुरळ...

रणबीर आणि आलिया नुकतेच ब्रह्मास्त्र या सिनेमातून एकत्र झळकले. दोघेही पहिल्यांदाच एका सिनेमात एकत्र झळकले असून दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना चांगलीच आवडली आहे. या सिनेमाने आतापर्यंत जवळपास 400 कोटींहून अधिक कमाई केलीय.