''गंगुबाई...' सिनेमामुळे आलियाला लागली भलतीच सवय, रणबीरही वैतागला

सिनेमाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी या गोष्टीचा खुलासा एका मुलाखतीद्वारे केला आहे.
Alia Bhatt,Ranbir Kapoor
Alia Bhatt,Ranbir KapoorGoogle
Updated on

आलिया भटच्या(Alia Bhatt) बहुचर्चित 'गंगूबाई काठियावाडी'(Gangubai Kathiawadi) सिनेमाची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागून राहिली आहे. आलियाचे चाहते तर तिला गंगूच्या भूमिकेत पडद्यावर पहाण्यासाठी ताटकळत आहेत. हा सिनेमा २५ फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमासाठी आलियानं स्वतःवर खूप मेहनत घेतल्याचं बोललं जात आहे. पण हे करताना तिच्यामुळे बॉयफ्रेंड रणबीर कपूरला मात्र खूप भोगावं लागतंय असं म्हटलं जात आहे. आता आलियाच्या मेहनतीचा आणि रणबीरच्या भोगण्याचा काय बरं संबध...सिनेमाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी प्रमोशन निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत आलियानं गंगूबाईच्या भूमिकेसाठी घेतलेल्या मेहनतीविषयी भरभरुन बोलले आहेत. तेव्हाच त्यांनी रणबीरसंदर्भातला किस्साही सांगितला.

'गंगूबाई काठियावाडी' सिनेमात आलिया भट्टनं एका साध्या-सरळ मुलीची व्यक्तिरेखा साकारली आहे. जी नंतर राजकारणात प्रवेश करते. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे,ज्यात संजय लीला भन्साळी बोलत आहेत की आलियानं प्रत्यक्ष तिच्या आयुष्यातही गंगूबाई बनण्याचा प्रयत्न केला. तिच्या बॉयफ्रेडनं माझ्याकडं तक्रार केली होती की ती घरी पण गंगूबाईसारखं बोलते. अर्थात बॉयफ्रेंड म्हणजे कोण आपला रणबीर कपूर. भन्साळी पुढे म्हणाले,''आलिया तिच्या भूमिकेत एकदम समरस होऊन गेली आहे.मला माहित नव्हतं ती इतकी उत्तम डान्सर आहे. ढोलडा गाण्यावरचा तिचा डान्स पाहून मी थक्क झालो. हे केवळ एका भूमिकेला आपलसं मानून केल्यावरच शक्य होतं''.

Alia Bhatt,Ranbir Kapoor
फरहान-शिबानीचं मराठी लग्न; 'या' महाराष्ट्रीयन विधींनी रंगणार सोहळा

संजय लीला भन्साळी यांनी एका मुलाखतीत चक्क सांगितलं आहे की,'गंगूबाई काठियावाडी' या सिनेमातला एक सीन ते त्यांचा शेवटचा श्वास घेताना पाहू इच्छितात. पुढे ते म्हणाले,''एखादी भूमिका साकारताना जेव्हा तुम्ही स्वतःला विसरुन तुमच्यातल्या 'मी' च्या पलिकडे निघून जाता,त्यावेळी कोण तुम्ही,तुमचं अस्तित्व काय,तुमच्या समोर कोण आहे,कॅमेरा तुमच्यासमोर आहे का,तुम्ही कसे दिसत आहात,काय वाटतं, हे सगळं विसरुन जाता तेव्हा गंगूबाई काठियावाडी सारखी भूमिका जिवंत होते. आलियानं ती साकारताना नेमकं तेच केलं आहे. ती आपल्या भूमिकेत पूर्ण विरघळून गेली होती. तिनं दुःख,आनंद,जोश,द्वेश सगळं यातनं दाखवायचा प्रयत्न केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com