
'लग्नानंतर आयुष्य बदललं का?' रणबीर कपूरची प्रतिक्रिया चर्चेत...
रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) बॉलीवूडच्या फेव्हरेट कपल्सपैकी एक आहेत. ५ वर्ष त्यांनी रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर १४ एप्रिल २०२२ रोजी लग्नगाठ बांधली आहे. आलिया-रणबीरचा लग्नसोहळा ३ दिवस रंगला. १३ एप्रिलला मेहेंदी सोहळा,१४ तारखेला लग्न आणि १५ तारखेला लग्नाचं रीसेप्शन असा एकंदरीत कार्यक्रम होता. अर्थात लग्नानंतर दोघेही लगेच आपापल्या कामात बिझी झाले,त्यांना एकमेकांसोबत जास्त वेळ तसा मिळाला नाही.दोघंही सध्या आपापल्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत.(Life After Mariage, what Ranbir says?)
हेही वाचा: 'माझी मुलं गे किंवा लेस्बियन..' शमा सिकंदर पुढे जे बोलली त्याला मोठं मन हवं
रणबीर कपूरनं नुकतेच एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत लग्नानंतरच्या आयुष्यावर,त्यात झालेल्या बदलाविषयी भाष्य केलं आहे. तो म्हणाला आहे,''आलिया सोबत लग्न झाल्यावर मला फार फरक पडलेला नाही. आम्ही दोघं ५ वर्षांपासून एकत्र होतो. आम्हाला वाटलं की आता लग्न करायला हवं आणि म्हणून आम्ही लग्न केलं पण त्यावेळेस आम्ही एकमेकांना काही वचनं दिली आहेत,जी पूर्ण करण्यासाठी किंवा त्यांना निभावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू''.
हेही वाचा: Siddhant Kapoor: पार्टीत लपवलेले गांजा,MDMA?; DCP चा मोठा खुलासा
''लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही आमच्या शूटिंगला निघून गेलो. आलिया तिच्या शूटिंगवर गेली आणि मी मनालीला गेलो. जेव्हा ती लंडनहून परत येईल तेव्हा माझा सिनेमा 'शमशेरा' प्रदर्शित होईल आणि त्यानंतर मग आम्ही एक आठवड्याचा ब्रेक घेऊ. आम्हाला तर अजूनही आमचं लग्न झालं आहे असं वाटत नाही''.
हेही वाचा: नुपूर शर्मा वाद: गौतम गंभीरला स्वरा भास्करनं फटकारलं; म्हणाली...
आलिया भट्ट-रणबीर कपूरच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर ते दोघे पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसतील ते 'ब्रह्मास्त्र' सिनेमातून. अयान मुखर्जीच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या सिनेमात अमिताभ बच्चन व्यतिरिक्त मौनी रॉय,नागार्जुन,डिंपल कपाडिया असे कलाकार महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. हा सिनेमा ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित केला जाईल असं सध्या बोललं जात आहे. याव्यतिरिक्त आलिया आपल्या हॉलीवूड सिनेमातील पदार्पणाविषयी देखील उत्सुक आहे. 'हार्ट ऑफ स्टोन' सिनेमात ती काम करतेय. आलियाने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमासाठी शूटिंग केलं आहे. याव्यतिरिक्त आलिया 'जी ले जरा' सिनेमातही दिसणार आहे. ज्याचं शूटिंगही लवकरच सुरू होईल असं बोललं जात आहे. या सिनेमात तिच्यासोबत प्रियंका चोप्रा आणि कतरिना कैफ दिसणार आहेत.
हेही वाचा: Siddhant Kapoor: सिद्धांत कपूरला जामीन मंजूर, मात्र पोलिसांनी घातली अट
रणबीर कपूर च्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर त्याचा 'शमशेरा' सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत संजय दत्त देखील मुख्य भूमिकेत आहे. या व्यतिरिक्त 'Animal' सिनेमातही रणबीर दिसणार आहे. लव रंजनच्या रोमॅंटिक कॉमेडी सिनेमात श्रद्धा कपूर सोबतही तो काम करीत आहे.
Web Title: Ranbir Kapoor Speaks On Marriage
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..