Video: 'तू मामा बन गया तू चाचा बन गया...' रणवीरचा तो व्हिडिओ व्हायरल

तू मामा बन गया,तू चाचा बन गया..व्हिडिओतील हे वाक्य सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतंय.
Ranbir kapoor video viral on social media
Ranbir kapoor video viral on social mediaesakal

रणबीर आणि आलिया लवकरच एका गोंडस बाळाचे आई बाबा होणार हे कळताच चाहत्यांचा आनंद दुप्पट झालाय. तर दुसरीकडे पॅपराझीला या दोघांपैकी कोणीही दिसलं की त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याची कुठलीच संधी पॅपराझी सोडत नाहीत. रणबीर आणि पॅपराझीच्या संवादाचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होतोय.

'तू मामा बन गया,तू चाचा बन गया..' व्हिडिओतील हे वाक्य सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतंय. या व्हिडिओमध्ये पॅपराझीने रणबीरचं बाबा होणार याबद्दल अभिनंदन केलंय. त्यावर हसत हसत रणबीर पॅपराझीला म्हणतो, 'तू मामा बन गया तू चाचा बन गया.' हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. बाबा होणाऱ्या रणबीरने पॅपराझीलाही शुभेच्छा दिल्या आहेत. मी बाबा होणार तर तुम्ही मामा, काका होणार या अर्थाचं वाक्य त्याने या व्हिडिओमध्ये म्हटलंय. त्याच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रियाही आल्या आहेत. रणबीरचं कौतुक यावेळी नेटकऱ्यांनी केलंय.

लवकरच बाबा होणारा रणबीर सध्या 'शमशेरा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आदित्य चोप्रा निर्मित हा चित्रपट येत्या २२ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणबीरबरोबरच संजय दत्तही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com