खूप लवकर गेलात काका.. 'या' अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actress anagha atul lost her uncle

खूप लवकर गेलात काका.. या अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर

स्टार प्रवाह वरील (Star Pravah) रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla)ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. दीपा आणि कार्तिक यांची लव्ह स्टोरी रंगत चालली आहे. पण त्यांच्या नात्यात वेळोवेळी दुरावा असणारी श्वेताही प्रेक्षकांची लाडकी आहे. तिच्या भूमिकेवर चाहते भरभरून प्रेम करतात. तिने साकारलेली खलनायिका इतकी अप्रतिम आहे की प्रेक्षकांना त्या भूमिकेचा रागही येतो. श्वेता हे पात्र अनघा अतुल (anagha atul) म्हणजे अभिनेत्री अनघा भगरे (anagha bhagare) साकारते आहे. अनघाने नुकतीच एक पोस्ट भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने आपल्या काकांविषयी लिहिले आहे.

हेही वाचा: Photo: अबब !.. सोनाली कुलकर्णीच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो व्हायरल..

या पोस्टमध्ये तिने एक जवळची व्यक्ती गमावल्याचे सांगितले आहे. ही व्यक्ती म्हणजे तिचे भय्या काका. काही दिवसांपूर्वी तिच्या काकांचे निधन झाले आहे. काकांचा फोटो पोस्ट करत लिहते, '९/५/२०२२.. खूप लवकर गेलास रे. तू काका नाही मित्र होतास माझा. आपल्या खूप पार्टीज पेण्डिंग आहेत. “अॅना, मला मुलगी नाही त्यामुळे तुझ कन्यादान मीच करणार “ हे सतत सांगायचास. स्वतःच्या मुलीसारखाच मला खुप प्रेम दिलस.

पुढे ती म्हणते, 'नेहमी भेटलो की वरण तूप पोळी चा बेत करायचो. कारण काका पूतणीची आवड अगदी सेम. स्वतःच्या आनंदासोबातच स्वतःची दुःख अगदी मोकळेपणाने शेअर करायचास. तू शिकवलस नेहमी आनंदी कस रहायच. कहिही झाल तरी ग्राउंडेड रहायच. मोठयांचा आदर करायचा.' अनघाची ही पोस्ट पाहून चाहतेही तिच्या दुःखात सहभागी झाले आहेत. अनघा भगरे (Angha Bhagare) ही बहुचर्चित आणि परिचित भगरे गुरुजींची कन्या आहे.

Web Title: Rang Maza Vegala Actress Anagha Bhagare Lost Her Uncle

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top