Ranveer Singh : इंदौरमध्ये रणवीरसाठी लोकं कपडे गोळा करताहेत!

बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता रणवीर सिंगला न्युड फोटोशुट चांगलचं महागाज पडलं आहे.
ranveer singh news
ranveer singh newsesakal

Ranveer Singh Photoshoot: बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता रणवीर सिंगला न्युड फोटोशुट चांगलचं महागाज पडलं आहे. त्याच्यावर आता गुन्हाही दाखल करण्यात (bollywood news) आला आहे. रणवीरच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. ज्यावेळी त्यानं अशा प्रकारचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यावरुन अनेकांनी नाराजीही व्यक्त केली होती. बॉलीवूडमधील सेलिब्रेटी मात्र त्याच्या समर्थनार्थ आहेत. आलियानं त्याची बाजू घेतली आहे. अर्जुन कपूरनं देखील (Arjun kapoor) रणवीरनं काही गैर केलं नसल्याचे सांगितले होते. अशावेळी रणवीरच्या बाबत सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये देखील रणवीरच्या न्युड फोटोशुटचा निषेध करण्यात आला आहे. मध्यप्रदेशातील इंदोरमधील लोकांनी रणवीरसाठी कपडे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. इंदोरमध्ये सामाजिक काम करणाऱ्या त्या संस्थेनं कपडे गोळा करुन रणवीरप्रती आपला निषेध व्यक्त केला आहे. मुंबईमध्ये देखील रणवीरच्या त्या फोटोंवरुन नाराजी व्यक्त करण्यात आली होती. यापूर्वी रणवीर हा त्याच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत आलेला अभिनेता आहे. बेयर ग्रिल्सच्या कार्यक्रमात रणवीरनं ग्रिल्सला किस केलं होतं. रणवीरच्या त्या फोटोशुटवर मुंबई आणि इंदौरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ranveer singh news
Ranveer Singh च्या न्यूड फोटोंवरनं रामूनं छेडला स्त्री-पुरुष समानतेचा वाद

इंदोरमध्ये नेकी की दीवारनं रणवीरच्या त्या फोटोशुटवर निषेध व्यक्त केला आहे. रणवीरचं ते फोटोशुट म्हणजे मानसिक कचरा म्हटला होता. गरीबांसाठी कपडे गोळा करणाऱ्या त्या संस्थेनं रणवीरला आपल्या वेगळ्या कृतीतून उत्तर दिलं आहे. त्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चाही आहे. ते फोटो आता रणवीरलाही पाठविण्यात आले आहे.

ranveer singh news
Movie Review: भावनिक नातेसंबंधांवर भाष्य करणारा 'जुग जुग जिओ'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com