Filmfare Awards : रणवीर पत्नी दीपिका, कतरिनाबद्दल असं काही बोलला की सर्व लागले हसायला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranveer Singh News

रणवीर पत्नी दीपिका, कतरिनाबद्दल असं काही बोलला की सर्व लागले हसायला

Ranveer Singh News रणवीर सिंग (Ranveer Singh) नेहमीच पत्नी दीपिका पदुकोणचे कौतुक करतो. संधी मिळताच दीपिकाबद्दल बोलतो. फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये त्याने स्वतःलाच नाही तर विक्की कौशललाही (Vicky Kaushal) लकी म्हटले आहे. फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये रणवीर अनेक मुद्द्यांवर बोलला. ‘विक्की आणि माझे लूक खूप सारखे आहेत. दोघेही उंच गडद आणि देखणे आहेत. दोघेही परीकथेत म्हणजेच स्वप्नांच्या जगात जगत आहेत’ असे रणवीर म्हणाला.

रणवीरने २०१८ मध्ये दीपिकासोबत लग्न केले होते. तर विक्कीने (Vicky Kaushal) गेल्यावर्षी कतरिनासोबत लग्न केले. ‘हे वर्ष विक्की कौशलसाठी खूप छान आहे. मी आणि विक्की दोघेही आईचे लाडके आहोत. करण जोहरचा चित्रपट तख्तमध्ये आम्ही एकत्र काम करणार होतो. कारण, आम्हा दोघांचा लूक सारखाच आहे. आम्ही दोघेही उंच, गडद आणि देखणे आहोत’, असे अवॉर्ड शो दरम्यान विक्कीसोबत काय घडते यावर बोलताना रणवीर (Ranveer Singh) म्हणाला.

मी दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि विक्कीने कतरिना कैफशी (Katrina Kaif) लग्न केले. आता आम्ही आपापल्या स्वप्नांच्या जगात जगत आहोत. लोक म्हणतात की त्या दोघेही आमच्या औकातच्याबाहेर (अधिकार) आहेत, असेही रणवीर म्हणाला.

रणवीरचे हे म्हणणे ऐकून सगळे हसायला लागले. यानंतर रणवीर आलिया आणि रणबीरच्या लग्नाबद्दलही बोलला. ‘आलिया आणि रणबीरचे लग्न सर्वोत्कृष्ट होते. त्यांनी अन्नाचे किती पैसे वाचवले? माझे सिंधी वडील त्यांच्या लग्नाने सर्वाधिक आनंदी होते’, असेही रणवीर म्हणाला.

रणवीरला ८३ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. ही ट्रॉफी देण्यासाठी खास दीपिका पदुकोण आली होती. त्याचवेळी विक्की कौशलला सरदार उधम चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (समीक्षकांची निवड) पुरस्कार मिळाला.