रविवारी सुट्टी मागितली म्हणून मालिकेतूनच काढलं; शुभांगी चौकसीचा मोठा खुलासा Shubaavi Choksey | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shubhaavi choksey

रविवारी सुट्टी मागितली म्हणून मालिकेतूनच काढलं; शुभावी चौकसीचा मोठा खुलासा

'कसौटी जिंदगी की २' आणि 'बडे अच्छे लगते है २' फेम शुभावी चौकसी(Shubhaavi choksey) एक उत्तम अभिनेत्री आहे. तिनं आतापर्यंत अनेक मालिकांमधून(Tv Serial) सॉफ्ट आणि ग्रे शेडच्या अनेक भूमिका केलेल्या आहेत. त्या दोन्ही प्रकारच्या भूमिकांमध्ये ती परफेक्ट फीट बसते. ती आपल्या कामाविषयी खूप उत्साही आहे,मेहनती आहे. पण अशा अभिनेत्रीविषयी आता बातमी कळतेय की तिनं रविवारची सुट्टी मागितल्यानं तिला एका नाही तर चक्क दोन मालिकांमधून बाहेरचा रस्ता दाखवला गेला आहे.

हेही वाचा: Chris Rock ला स्टॅंडअप कॉमेडी करताना आठवलं 'थप्पड' प्रकरण; म्हणाला...

शुभावीनं स्वतःच या प्रकरणाचा खुलासा करताना म्हटलं आहे,''मी जेव्हा काम करणं सुरु केलं तेव्हा,मी रविवारी देखील काम करत होते.पण जेव्हा माझा मुलगा आरव झाला त्यानंतर पुन्हा काम सुरु करताना मी निर्णय घेतला की नवऱ्याला आणि मुलाला दोघांनाही वेळ देण्यासाठी एक दिवस तरी सुट्टी घेत जाईन. माझ्यासाठी कुटुंबासोबत वेळ घालवणं देखील महत्त्वाचं होतं. मी २०१२ मध्ये काम करणं सुरू केलं. तेव्हा मी आठवड्यातून एक दिवस सुट्टी घेत होते''.

हेही वाचा: The Archies Teaser: सुहाना खान,खुशी कपूर,अगस्त्य नंदा;'द आर्चिज' फर्स्ट लूक

ती पुढे म्हणाली,''तेव्हा सुट्टीवरुन माझी प्रॉडक्श हाऊससोबत थोडी बाचाबाची व्हायची. जेव्हा मी त्या लोकांना माझ्या रविवारच्या सुट्टीविषयी सांगायचे तेव्हा ते म्हणायचे,'मॅम,असं शक्य नाही'. पण जेव्हा मी माझ्या सुट्टीवर अडून बसायचे आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये नमूद करायला सांगायचे ती सुट्टी तेव्हा ते सुरुवातीला मागे-पुढे करायचे तसं करण्यासाठी. पण जेव्हा माझं त्यामागचं उद्दिष्ट त्यांना कळायचं तेव्हा ते माझं मागणं मान्य करायचे. अशी खूप जणांनी माझी मागणी मान्य केली होती आतापर्यंत''.

हेही वाचा: वयाच्या ७४ व्या वर्षी मुमताजचा 'त्या' विवाहबाह्य संबंधाविषयी मोठा खुलासा

पण शुभावीच्या रविवाच्या सुट्टीच्या डीमांडमुळे तिला कितीतरी शोजमधून बाहेर पडावं लागलं आहे. तिनं स्वतः याबाबतीत खुलासा करताना म्हटलं आहे,''मला रविवारची सुट्टी मागितल्यावर शो सोडावा लागला आहे. मला प्रॉडक्शन हाऊसचं म्हणणं पटतं पण माझी 'ही' सुट्टी गरज आहे माझ्या मुलासाठी. कारण मला माझा फॅमिली टाइमही हवा आहे. शुभावीला वाटतं आता खरंतर अभिनयक्षेत्रातही रविवारची सुट्टी कम्पलसरी करायला हवी. विकली ऑफ हा प्रकार अभिनय क्षेत्रातही असावा. कायद्यानं तर रविवारी सुट्टी मिळायलाच हवी''.

Web Title: I Lost Out On Two Shows Because I Asked For A Sunday Off Shubhaavi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top