वयाच्या ७४ व्या वर्षी मुमताजचा 'त्या' विवाहबाह्य संबंधाविषयी मोठा खुलासा

पोटाच्या दुखण्यामुळे काही दिवस मुमताज हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. त्यानंतर घरी परतलेल्या मुमताज यांनी एका मुलाखतीत वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक खुलासे केले आहेत.
Mumtaz talks about her extra-marital affair
Mumtaz talks about her extra-marital affairGoogle
Updated on

ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज(Mumtaz) यांनी नुकत्याच एका मुलाखतीत विवाहबाह्य संबंधाविषयी(Extra Marital Affair) मोठा खुलासा केला आहे. मयुर माधवानी यांच्याशी लग्न केल्यानंतर आपल्या आयुष्यात मोठं वादळ आलं ज्यानं काही काळ का होईना आपल्या संसाराला दुःखाचे चटके बसले होते असं त्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं.

Mumtaz talks about her extra-marital affair
संजय-मान्यता दत्तमध्ये 'का रे दुरावा'; अभिनेत्यानेच केला खुलासा

एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत मुमताज पहिल्यांदा आपले पती मयुर माधवानी यांच्या अफेअर्सविषयी पसरलेल्या अफवांविषयी बोलू लागल्या. त्या म्हणाल्या, ''पुरुषांसाठी अफेअर्स ही खूप सर्वसामान्य गोष्ट आहे. ती सहज मागच्या दरवाज्यानं त्यांच्या आयुष्यात येते हे अनेकदा त्यांना स्वतःला देखील कळत नाही. पण मला माझ्या नवऱ्याचा अभिमान वाटतो की त्यानं याविषयी माझ्यापासून लपवून ठेवलं नाही. त्यानं मला सगळं खरं खरं सांगितलं''.

Mumtaz talks about her extra-marital affair
कमल हासन विरोधात तक्रार; केंद्र सरकारचा अपमान केल्याचा आरोप,काय आहे प्रकरण?

ते मला म्हणाले की,''अमेरिकेत असताना एक मुलगी त्यांना आवडायला लागली. कारण ते तिथेच जन्माले आणि वाढले होते. त्यामुळे त्यांचं अमेरिका,तिथल्या माणसांशी एक वेगळं कनेक्शन होतं. त्यांनी मला इतकं देखील तेव्हा सांगितलं की,''ते तिच्यावर कायम प्रेम करत राहणार,तिला कधीच सोडणार नाहीत. पण अर्थात ही स्टोरी आता संपली आहे हे सांगायला मुमताज विसरल्या नाहीत. माझ्या नवऱ्यानं मला राणीसारखं ठेवलं, मी मागण्याची खोटी ते लगेच हजर व्हायचं'', असं देखील यावेळी मुमताज म्हणाल्या.

Mumtaz talks about her extra-marital affair
धर्मवीरचा 'आनंद' भिडला गगनाला, पहिल्याच दिवशी 2 कोटींची कमाई

त्यानंतर मुमताज यांनी स्वतःविषयी देखील एक मोठा खुलासा केला. त्या म्हणाल्या,''मला माझ्या नवऱ्याविषयी सगळं समजल्यानंतर खूप एकटं वाटायला लागलं आणि मी मनातून दुखावले होते. मग मी भारतात परत आले. मी त्या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला दूर घेऊन आले. पण हे देखील खरं आहे की ते सगळं तात्पुरतं होतं,ते तेवढं गंभीर नव्हतं. कारण ते लगेच संपलं देखील. उलट मी खूप लकी आहे,माझ्या नवऱ्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे''.

Mumtaz talks about her extra-marital affair
अमिताभनी 'या' कारणानं डिलीट केली कंगनासाठी लिहिलेली पोस्ट; ब्लॉगमधून खुलासा

काही दिवसांपूर्वी मुमताज पोटाच्या दुखण्यानं हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होत्या. त्यांना कॅन्सर झाल्याच्या बातम्याही पसरल्या होत्या. पण आजाराशी झुंज दिल्यानंतर आता त्या आपलं आयुष्य पुर्ववत छान जगत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com