
बिकिनीत आयरा तर शर्टलेस आमिर, बर्थे डे पार्टीतील बाप-बेटीचा 'तो' फोटो ट्रोल
आमिर खान(Aamir Khan) ची मुलगी आयरा खान(Ira Khan) ८ मे,२०२२ रोजी २५ वर्षांची झाली. यानिमित्तानं आमिर खाननं मुलीसाठी पूल पार्टीचं आयोजन केलं होतं. पण हा बर्थडे (Birthday Party) सेलिब्रेट करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि तो पाहून चाहते मात्र नाराज झालेयत आणि ट्रोलर्सनी आयरासोबत आमिरवरही निशाणा साधला. या फोटोत आयरा बोल्ड बिकीनी अवतारात दिसत आहे आणि केक कापत आहे. तिच्या सोबत बाजूला तिचे कुटुंबिय देखील आहे. आमिरदेखील त्या फोटोत आयराच्या बाजूला शर्टलेस अवतारात दिसत आहे. आयराची आई रीना दत्ता,सावत्र भाऊ आझाद राव देखील दिसत आहे. हा फोटो पाहून चाहत्यांनी या पूल पार्टीवरुन आमिर-आयराला धारेवर धरलंय आणि खूप तिखट प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एकानं म्हटलं आहे,''विश्वास नाही बसत हे पाहून''. तर दुसरा एकजण म्हणाला आहे,''वडील आणि मुलगी आहेत हे दोघे,व्वा! काय ड्रेस घातला आहे. यांना कुठे काय घालायचं याची देखील शिस्त नाही.थोडी तरी लाज बाळगा''. एकानं लिहिलं आहे,''वाढदिवशी कुणी असा ड्रेस घालतो का?'' अशा अनेक प्रतिक्रियांनी आमिर-आयराला टार्गेट केलं आहे.
आयरा खानचा बिकीनी घातलेला हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही तासातच या फोटोविरोधात प्रतिक्रिया नोंदवल्या गेल्या. आयरा खान ही आमिरची पहिली बायको रीना दत्ता हिची मुलगी आहे. आमिर आणि रीना दत्तानं १९८६ साली लग्न केलं होतं. पण त्यानंतर जवळपास पंधरा वर्षाचा संसार केल्यानंतर आमिरनं रीना दत्ताला घटस्फोट देत किरण रावशी २००२ मध्ये लग्न केलं. मात्र आमिर आणि किरण राव देखील २०२१ मध्ये विभक्त झाले. आमिर खानला जुनैद,आझाद आणि आयरा ही तीन मुलं आहेत. घटस्फोटानंतरही आमिरचे आपल्या दोन्ही पत्नींसोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि सुख-दुःखाच्या प्रसंगात हे कुटुंब एकत्र पहायला मिळतं. आमिरच्या प्रॉडक्शन हाऊसमध्येही त्याच्या दोन्ही पत्नी कोणत्या न कोणत्या स्वरुपात आता देखील कार्यरत आहेत.
हेही वाचा: 'बाळासाहेबांनी आदेश देऊनही आनंद दिघेंनी तो पाळला नव्हता कारण...'- प्रसाद ओक
आमिरची मुलगी आयरा खानच्या वाढदिवशी देखील आमिर,रीना,किरण राव,आझाद राव हे सगळे एकत्र पहायला मिळाले. यावेळी आयराचा बॉयफ्रेंडही या पूल पार्टीत सामिल झाला होता. कुटुंबानं एकत्र खूप धम्माल केलेली फोटोतून दिसतच आहे पण आता आयरा आणि आमिरला त्या पूल पार्टीतल ड्रेसिंग चांगलंच महाग पडलं आहे हे देखील समोर आलं आहे. आयरा खान नेहमीच सोशल मीडियावर तिच्या पोस्टमुळे,बोल्ड फोटो मुळे,व्हिडीओ मुळे चर्चेत असते.
Web Title: Aamir Khans Daughter Ira Khan Trolled And Called Besharam For Cutting Her Bday Cake In A Bikini
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..