
रणवीरनं वॅनिटीत चिकटवलंय चार्ली चॅपलिनचं मोठं पोस्टर;कारण ऐकून व्हाल थक्क
बॉलीवूडचा मोस्ट एनर्जेटिक अभिनेता रणवीर सिंग(Ranveer Singh) सध्या आपला सिनेमा 'जयेशभाई जोरदार'(Jayeshbhai Jordaar) मुळे भलताच चर्चेत आहे. कॉमेडीची धमाल अनुभवायला मिळणाऱ्या या सिनेमात रणवीर एका गुजराती व्यक्तीची भूमिका साकारत आहे. जो आपल्या एका जन्माला न आलेल्या मुलीसाठी समाजाच्या कर्मट विचारांविरोधात लढा देताना दिसत आहे. आता रणवीरनं खुलासा केला आहे की, 'जयेशभाई जोरदार' सिनेमातील त्याची व्यक्तीरेखा ही प्रसिद्ध कॉमेडियन चार्ली चॅपलिन यांच्यापासून प्रेरित आहे.
हेही वाचा: हिंदी भाषा वादात सोनू निगमची उडी; म्हणाला,'भारताच्या समस्या वाढवू नका'
रणवीरनं एका मुलाखतीत यासंदर्भात खुलासा केला आहे. तो म्हणाला,हा सिनेमा मुलगा-मुलगी या दोघांना समान हक्क दिले गेले पाहिजेत,स्त्री भ्रुण हत्या या विषयावर प्रखर भाष्य करताना दिसेल. फक्त विनोदाचा साज चढवून हा गंभीर विषय लोकांपर्यंत हलका-फुलका करुन पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे''. पुढे तो म्हणाला,''जयेशभाई ही एक अशी व्यक्तीरेखा आहे ज्याचं हिंदी सिनेमात तसं फारसं स्थान नाही. पण ही भूमिका जर कोणाशी साधर्म्य साधत असेल तर ते चार्ली चॅपलिन असतील,असं मला वाटतं''.
हेही वाचा: शत्रुघ्न सिन्हांंवर मॉडेलचा Sex Scam चा आरोप, म्हणाली,'मला बेशुद्ध करुन...'
''एका कलाकाराच्या रुपात त्यांच्याकडे आपलं दुःख सहन करायची आणि खूप शिताफिन त्याच्याशी खेळण्याची एक अनोखी कला होती. त्यांचं आयुष्य दुःखानं व्यापलेलं होतं पण त्यांच्याकडे विनोदाचं सामर्थ्य इतकं होतं की त्यातून ते सहज बाहेर येण्यासाठी सक्षम होते''. रणवीरनं पुढे आपल्या भूमिकेविषयी सांगताना म्हटलं आहे की,''मी जेव्हा सिनेमाच्या निमित्तानं रिसर्च केला तेव्हा चार्ली चॅपलिन(Charlie Chaplin) यांचा एक क्लोज फोटो मी पाहिला. तेव्हा मला सुरुवातीला खूप हसायला आलं,पण जर तुम्ही त्यांच्या डोळ्यात पहाल अगदी त्यांच्या कोणत्याही फोटोमधील, तर कळेल की त्यांचे डोळे अश्रूंनी भरलेले आहेत.. जयेशच्या भूमिकेसाठी हिच माझी मोठी प्रेरणा होती. मी या फोटोला चार बाय चार च्या साइजमध्ये बसवून मोठं पोस्टर करवुन घेतलं आणि माझ्या वॅनिटी मध्ये चिटकवलं. यामुळे जयेश बनण्यासाठी मला जे स्वतःमध्ये आणायचं होतं त्याचे अचूक संकेत मिळाले''.
हेही वाचा: Met Gala 2022: 60 वर्ष जुना, 36 करोडचा ड्रेस घालणारी kim Kardashian चर्चेत
'जयेशभाई जोरदार'r सिनेमात रणवीर सिंग सोबत शालिनी पांड्ये देखील दिसणार आहे. सिनेमात रणवीर सिंग,शालिनी पांड्ये व्यतिरिक्त बोमन ईराणी आणि रत्ना पाठक देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. दिव्यांग टक्कर दिग्दर्शित हा सिनेमा १३ मे २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
Web Title: Ranveer Singh Reveals Pasting Charlie Chaplins Poster In His Vanity
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..