'कधीही न मरणारं फूल',जीव धोक्यात टाकून रणवीरचं दीपिकाला सरप्राइज गिफ्ट Ranveer Singh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranveer Vs Wild With Bear Grylls’: Love is the driving force for survival in the wild

'कधीही न मरणारं फूल',जीव धोक्यात टाकून रणवीरचं दीपिकाला सरप्राइज गिफ्ट

रणवीर सिंग(Ranveer Singh) लवकरच बेयर ग्रिल्सच्या (Bear Grylls) शो मध्ये दिसणार आहे,ज्याचं नाव आहे 'रणवीर व्हर्सेस वाइल्ड विथ बेयर ग्रिल्स' (Ranveer Vs Wild With Bear Grylls’). नेटफ्लिक्सनं या शो चा नवा ट्रेलर रिलीज केला आहे. शो मध्ये रणवीर सिंग जबरदस्त अॅडव्हेंचर करताना दिसणार आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला रणवीर सिंग बोलताना दिसतोय,''जिद्द. आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येण्याची जिद्द. परंतु ही जिद्द आपल्याला एका वेळी फसवू देखील शकते. तुम्हाला माहितही पडत नाही. यानंतर आपल्याला रणवीर जबरदस्त स्टंट करताना दिसणार आहे. कधी त्याचा सामना अस्वलासोबत होताना दिसतो, तर कधी जंगली लांडग्यासोबत तर कधी भयानक सापासोबत. रणवीरचे हे स्टंट तुम्हाला थक्कं करुन सोडतील हे निश्चित. मात्र त्याचे हे स्टंट पाहताना तुम्ही एन्जॉय करणार हे निश्चित''.(Ranveer Vs Wild With Bear Grylls’: Love is the driving force for survival in the wild)

या सर्व अॅडव्हेंचर दरम्यान रणवीर आपली पत्नी दीपिकासाठी(Deepika Padukone) प्रेम व्यक्त करणं मात्र सोडत नाही. तो चक्क जंगलात दीपिकासाठी एक स्पेशल फूल तोडायला जातो आणि ते देखील मोठा धोका पत्करुन. त्या फुलाचं वैशिष्ट्य हे आहे की ते कधीच मरत नाही,म्हणजे कोमेजत नाही. रणवीर म्हणताना दिसतोय,लोक आपलं प्रेम व्यक्त करताना म्हणतात मी चंद्र-तारे तोडून आणेन. मी दीपिकासाठी एक स्पेशल फूल तोडून आणणार आहे,जे कधीच मरत नाही अगदी माझ्या प्रेमासारखं''.

हेही वाचा: 'पोंक्षेंनी मानले एकनाथ शिंदेंचे आभार'; 'त्या' पोस्टची रंगली चर्चा

एक मजेदार सीनही तितक्यात घडतो जेव्हा रणवीर माती आपल्या मस्तकाला लावतो. तेव्हा बेयर त्याला म्हणतो कसा,''ती लांडग्याची विष्ठा होती''. तर दुसरीकडे रणवीर डोंगर चढताना बेयरला जय बजरंग बली बोलायला शिकवताना दिसतो. या शो ची खासियत आहे की,इथे रणवीर जे स्टंट करणार आहे त्यात यूजर्स ठरवणार की त्यानं पुढे काय करायला हवं आहे.

हेही वाचा: 'शिंदेशाही' घराणं वर्ल्ड रेकॉर्डच्या यादीत; लोकसंगीतानं केला नवा विक्रम

ट्रेलरला शेअर करताना लिहिलं आहे की,''आता रणवीर सिंगचं आयुष्य तुमच्या हातात आहे. बटन दाबा आणि त्याला वाचवा. रणवीर सिंग विथ बेयर ग्रिल्स,नेटफ्लिक्स इंडियाचा पहिला इंटरअॅक्टिव्ह शो जुलै, १८ रोजी भेटीस येत आहे''.

Web Title: Ranveer Vs Wild With Bear Grylls Love Is The Driving Force For Survival In The

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..