सारा अली खानवर सलमान नाराज,सिनेमातून काढण्याची दिली धमकी?

आयफा २०२२ च्या पुरस्कार सोहळ्यात साराला भर कार्यक्रमात एक मोठी चूक महाग पडल्याचं बोललं जात आहे. सध्या त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
Salman Khan to Sara Ali Khan-  ‘your film is gone now’. Read Inside Details
Salman Khan to Sara Ali Khan- ‘your film is gone now’. Read Inside DetailsInstagram

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान(Salman Khan) सगळ्यांचाच लाडका भाईजान आहे. ना केवळ चाहते, पण मोठमोठे दिग्गज सेलिब्रिटी देखील त्याच्या प्रेमात आहेत. दबंग खानचं व्यक्तिमत्त्वच असं आहे की त्याच्यासमोर सगळे पानी कमच दिसतात. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,ज्यामध्ये सारा अली खान भर कार्यक्रमात त्याला 'अंकल' म्हणून संबोधते. आणि सारानं (Sara Ali Khan) 'अंकल' म्हटल्यावर सलमानची रिअॅक्शन पाहण्यासारखी आहे. तो देखील बोलताना दिसतोय-'तुझ्या हातातून सिनेमा तर गेला'. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे.(Salman Khan to Sara Ali Khan- ‘your film is gone now’. Read Inside Details)

Salman Khan to Sara Ali Khan-  ‘your film is gone now’. Read Inside Details
'कधीही न मरणारं फूल',जीव धोक्यात टाकून रणवीरचं दीपिकाला सरप्राइज गिफ्ट

एका कार्यक्रमात सलमान खान आणि सारा अली खान एकत्र स्टेज शेअर करताना दिसत आहेत. सारा बोलताना दिसत आहे कि ती एक ब्रॅन्ड लॉंच करण्याच्या विचारात आहे. ती पुढे म्हणते,''सलमान अंकलसोबत''. हे ऐकून दबंग खान उत्तरादाखल म्हणतो कसा,''तुझ्या हातातून सिनेमा तर गेला. हे ऐकून सारा जरा खट्टू होते''. आणि विचारते,''माझ्या हातातून सिनेमा का गेला?'' तेव्हा सलमान म्हणतो,''तु सगळ्यांसमोर मला 'अंकल' म्हटलंस''. मग काय सारा देखील गप्प बसत नाही आणि म्हणते,''तुम्हीच मला 'अंकल' म्हण असं म्हटलं होतं मागे''. मग दोघंही एकमेकांची थट्टा-मस्करी करत टन टना टन गाण्यावर धमाल डान्स करतात.

चाहत्यांना सारा आणि सलमानचं हे क्यूट भांडण भलतंच आवडलं आहे. कोणी तरी म्हटलंय की, 'हे दोघे जेव्हा स्टेजवर एकत्र येतात तेव्हा तिथे जादूई वातावरण निर्मिती करतात'. तर एका चाहत्यानं साराला देखील 'क्यूट' म्हणून संबोधलं आहे.

सारा अली खानच्या सिनेमां विषयी बोलायचं झालं तर,'केदारनाथ' मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या साराचा नुकताच 'अतरंगी' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. यामध्ये साऊथ अभिनेता धनुष आणि अक्षय कुमारसोबत ती महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारताना दिसली होती. याव्यतिरिक्त सारानं काही दिवस आधी विक्रांत मस्सीसोबत गुजरात मध्ये 'गॅसलाइट'चं शूटिंग पूर्ण केलं आहे. त्याआधी विकी कौशलसोबतही एका सिनेमाच्या शूटिंगमध्ये ती बिझी होती. बोललं जात आहे की हा सिनेमा 'लुकाछूपी'चा सिक्वेल आहे. याबरोबरच ती विकी कौशलसोबत 'द इम्मोर्टल अश्वत्थामा' सिनेमात दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com