Rashmika Mandanna: तुझ्या सौंदर्याचे रहस्य काय? प्रश्नाला रश्मिकाने दिलं हे मजेशीर उत्तर

Rashmika Mandanna: तुझ्या सौंदर्याचे रहस्य काय? प्रश्नाला रश्मिकाने दिलं हे मजेशीर उत्तर
Rashmika Mandanna
Rashmika Mandanna Sakal

रश्मिका ही अतिशय सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. रश्मिकाने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपला दमदार अभिनय सिद्ध केला आहे, तर ती अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसली आहे. रात्री उशिरा अभिनेत्री विमानतळावर दिसली. रश्मिका मुंबईहून मिलानला निघाली होती.

'मिशन मजनू' अभिनेत्री मिलान फॅशन वीकमध्ये सहभागी होणार आहे. त्याचवेळी एअरपोर्टवर पापाराझींनी रश्मिकाला तिच्या सौंदर्याचे रहस्य विचारले असता, अभिनेत्रीने मजेदार उत्तर दिले.

रश्मिका एअरपोर्टवर ब्लॅक लूकमध्ये दिसली. अभिनेत्रीने साधा काळ्या रंगाचा स्वेटशर्ट आणि पँट घातली होती. रश्मिकाने तिचे केस बनमध्ये बांधले होते आणि मिनिमल मेकअप मेकअप केला होता. साध्या लूकमध्येही अभिनेत्री कमालीची दिसत होती. रश्मिकाला पाहताच पापाराझींनीही तिचे फोटो जबरदस्त क्लिक केले.

यादरम्यान पापाराझींनी अभिनेत्रीला विचारले की तुझ्या सौंदर्याचे रहस्य काय आहे? हे ऐकून अभिनेत्री लाजली आणि म्हणाली, “स्माइल… आप, आप हो राज." यानंतर पापाराझींनी रश्मिकाचे कौतुक केले आणि म्हणाले, "तुझे स्माईल खूप गोड आहे, लव्ह यु मॅडम." यावर अभिनेत्रीने 'लव्ह यू' म्हंटले.

Rashmika Mandanna
Shah Rukh Khan: ना मालिका,ना सिनेमा.. 36 वर्षापूर्वी नाटकातून सुरु केली होती शाहरुखनं आपली कारकिर्द..

रश्मिका शेवटची शांतनु बागची दिग्दर्शित 'मिशन मजनू' चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसली होती. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. ही अभिनेत्री लवकरच 'अ‍ॅनिमल' या मोस्ट अवेटेड चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे.

चित्रपटात रणबीर कपूर, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून 'अ‍ॅनिमल' 11 ऑगस्ट 2023 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. रश्मिकाने नीना गुप्ता आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत गुडबाय या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com