
रश्मिका मंदान्नाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विजय देवराकोंडासोबत लग्नाच्या अफवांवर खुलासा केला. तिचे लग्न कधी होणार याचा खुलासाही तिने केला.
टॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना ही (Rashmika Mandana) सध्या चर्चेत आहे. तिच्या अल्लु अर्जुनसोबतच्या (Allu Arjun) पुष्पाला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. आता सध्या तिच्या नव्या रिलेशनशिपविषयी बोलले जात आहे. (Tollywood News) त्यातच तिच्या लग्नाच्या चर्चेलाही सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी कोण आहे रश्मिकाचा बॉयफ्रेंड असा ट्रेंडदेखील सोशल मीडियावर सुरु झाला होता. विजय देवरकोंडा (Vijay Deverkonda) आणि रश्मिका आता लग्न करणार असल्याचे सोशल मीडियावर बोलले जात आहे. गीता गोविंदम आणि डियर कॉम्रेडमध्ये या दोन्ही कलाकारांनी काम केलं होतं. त्यानंतर त्यांच्या जोडीला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती. (Rashmika Mandhana finally opens up about her marriage plans with Vijay Deverkonda)
आता रश्मिकाने एका मुलाखतीत तिच्या लग्नाबाबतच्या अफवांवर भाष्य केले आहे. तिला तिच्या भविष्यातील प्लॅन्सबद्दल विचारले असता ती म्हणाली, "ही फक्त टाईमपासची अफवा आहे. मला लग्नासाठी अजून बराच वेळ आहे. योग्य वेळ आल्यावर मी लग्न करेन. आणि त्या सर्व अफवा चालूदेत, माझी काही हरकत नाही."
अलीकडेच, रश्मिकानं मुंबईमध्ये घर खरेदी केलं आहे. तर मुंबईमध्ये विजय आणि रश्मिकाला डेट करत असल्याचे फोटोग्राफर्सनं पाहिलं होते. त्याचे फोटोही सोशल मीडियावरुन व्हायरल झाले होते. गोव्यातील एका ट्रीपवरुन रश्मिका आणि विजयच्या रिलेशनशिपला चर्चा सुरु झाली होती. अभिनेता विजय आणि त्याची आई यांच्यासोबत रश्मिकाचे चांगले संबंध आहेत.