'आजपर्यंत घायाळ केलं, या वेळेस जीवच घेईन'; नव्या 'शेवंता'ची एण्ट्री | Ratris Khel Chale | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

krutikaa tulaskar

'रात्रीस खेळ चाले'मध्ये नव्या 'शेवंता'ची एण्ट्री

Ratris Khel Chale 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेनं प्रेक्षकांचं अफाट प्रेम मिळवून अगदी पहिल्या पर्वापासूनच लोकप्रियतेचे शिखर गाठलं. लॉकडाउनमुळे शूटिंग बंद असल्यानं ‘रात्रीस खेळ चाले ३’ ही लोकप्रिय मालिका प्रसारित होत नव्हती. आता पुन्हा ही मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेतील सर्व कलाकार प्रेक्षकांचे अत्यंत आवडते आहेत आणि त्यातील एक व्यक्तिरेखा जिची मालिकेत प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत ती म्हणजे शेवंता Shevanta. मालिकेत आतापर्यंत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने Apurva Nemlekar शेवंताची भूमिका साकारली. मात्र आता अपूर्वाची जागा दुसऱ्या अभिनेत्रीने घेतली आहे. मालिकेत शेवंता म्हणून अभिनेत्री कृतिका तुळस्करची Krutika Tulaskar एण्ट्री होणार आहे. नव्या शेवंताला पाहून प्रेक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

'आजपर्यंत घायाळ केलं, या वेळेस जीवच घेईन', असं कॅप्शन देत कृतिकाने शेवंताच्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. काही महिन्यांपूर्वीच रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेच्या प्रोमोमध्ये सगळ्यांच्या काळजाचा ठाव घेणारी शेवंता प्रेक्षकांना दिसली. यावेळी तिला पाहून फक्त काळजाचा ठोका चुकणार नाही तर थांबेल कायमचा असा इशारा देणाऱ्या प्रोमोची चर्चा सर्वत्र झाली होती.

हेही वाचा: निलेश साबळे नारायण राणेंच्या पाया पडले; 'त्या' भूमिकेसाठी माफी!

'रात्रीस खेळ चाले'मध्ये शेवंताची भूमिका साकारत अपूर्वाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तेव्हापासून अपूर्वाच्या चाहतेवर्गात मोठी वाढ झाली. मात्र तिने अचानक मालिका का सोडली असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे.

loading image
go to top