'रात्रीस खेळ चाले' आता येणार हिंदीमध्येही,या तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

सध्या महाराष्ट्रातील घरघरांत पाहिली जाणारी मराठी मालिका म्हणजे 'रात्रीस खेळ चाले 2' ही आहे. कोकणातील प्रथा, अंधश्रद्धा यावर आधारीत ही मालिका आहे. विषेश म्हणजे ही मालिका आता दुसऱ्या एका भाषेतही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील घरघरांत पाहिली जाणारी मराठी मालिका म्हणजे 'रात्रीस खेळ चाले 2' ही आहे. या मालिकेत बऱ्याच घडामोडी होतच असतात. मालिकेमध्ये अनेक रहस्यमय घटना समोर येत असतात. त्यातील सस्पेन्समुळे लोकांमध्ये ही मालिका पाहण्याची उत्सुकता अधिकच वाढते. कोकणातील प्रथा, अंधश्रद्धा यावर आधारीत ही मालिका आहे. विषेश म्हणजे ही मालिका आता दुसऱ्या एका भाषेतही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

बाप-लेकीचं नातं आणि इरफानच्या इंग्रजीची कॉमेडी, पाहा ‘अंग्रेजी मीडियम’चा ट्रेलर

प्रेक्षकांच्या प्रेमामुळे या मालिकेचं दुसरं पर्व सुरु आहे. दुसऱ्या पर्वाची लोकप्रियताही सर्वाधिक आहे. नाइकांचा वाडा आणि त्याभोवती फिरणाऱ्या गोष्टी या खूपच रंजक आहेत. अल्पावधीतच या मालिकेने चांगलीच लोकप्रियता गाठली. मालिकेचं आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे  प्रथितयश कलाकार नसतानाही केवळ अभिनयाच्या जोरावर या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले. 

आमिरने करीनाला 'व्हॅलेंटाईन डे' विश केलं आणि म्हणला....

मालिकेला सुरुवातीला विरोधही झाला. पण, या मालिकेने आता 200 पेक्षा जास्त एपिसोड केले आहेत. लवकरच ही मालिका हिंदीमध्ये पाहायला मिळणार आहे. 'रात्रीस खेळ चाले' ही मालिका हिंदीमध्ये डब करण्यात आली आहे. या मालिकेचे नाव 'रात का खेल है सारा' असे ठेवण्यात आले असून अॅन्ड टीव्ही वाहिनीवर ही पाहायला मिळणार आहे. 29  फेब्रुवारीला ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratris Khel chale marathi serial will be telecast in hindi