'रात्रीस खेळ चाले' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; 29 ऑगस्ट रोजी शेवटचा एपिसोड 

संतोष भिंगार्डे
Wednesday, 12 August 2020

शेवंता आणि अण्णांची लव्हस्टोरीही प्रेक्षकांनी पाहिली. शेवंताचा मृत्यूही प्रेक्षकांनी पाहिला आणि आता अण्णांचे पुढे काय होणार असा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे.

मुंबई : 'झी मराठी'वरील लोकप्रिय मालिका 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेबाबत महत्वाची माहिती समोर येत आहे. प्रचंड लोकप्रिय ठरलेली ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 29 ऑगस्ट रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होईल आणि 31 ऑगस्टपासून 'देवमाणूस' ही नवी मालिका येणार आहे. देवमाणूस ही थ्रिलर मालिका असल्याचे समजते आहे.

BIG NEWS -  कोरोना चाचणीचे दर झालेत कमी, चाचणी झाली स्वस्त, जाणून घ्या नवीन दर...

निर्माता सुनील भोसलेच्या 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी चांगली दाद दिली. त्यानंतर या मालिकेचा प्रिक्वेल बनविण्यात आला आणि त्यालाही प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. या मालिकेतील अण्णा (माधव अभ्यंकर), शेवंता (अपूर्वा नेमळेकर), पांडू (प्रल्हाद कुडतरकर), दत्ता (सुहास शिरसाट) अशा सगळ्याच कलाकारांना चांगली लोकप्रियता मिळाली. 

मुंबई पालिकेच्या 'या' रुग्णालयात लवकरच सुरु होणार पोस्ट कोविड OPD

माधव अभ्यंकर यांनी साकारलेल्या अण्णांची खलनायकी भूमिका कमालीची गाजली. शेवंता आणि अण्णांची लव्हस्टोरीही प्रेक्षकांनी पाहिली. शेवंताचा मृत्यूही प्रेक्षकांनी पाहिला आणि आता अण्णांचे पुढे काय होणार असा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. आता या मालिकेचा शेवट कसा काय होणार, नेने वकील नेमकी कोणती भूमिका घेणार या प्रश्नांची उत्तरे आता शेवटच्या टप्प्यात मिळणार आहेत. 29 ऑगस्ट रोजी ही मालिका संपणार आहे. त्या दिवशी रात्री शेवटचा भाग प्रसारित होईल आणि तेथे 'देवमाणूस' ही नवीन मालिका येईल.
---
संपादन ः ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ratris khel chale serial will take good bye on 29 august from zee marathi