Raveena Tondon Viral Video : 'कुणालाही त्रास होता कामा नये'! रविना मेट्रो स्टेशनवर आली,कमालच झाली

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन ही गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आल्याचे दिसून आले आहे.
Raveena Tondon Spotted Andheri Mumbai Metro station
Raveena Tondon Spotted Andheri Mumbai Metro stationesakal

Raveena Tondon Spotted Andheri Mumbai Metro station : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन ही गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. तिच्या यापूर्वीच्या वेबसीरिज आणि चित्रपट यांना चाहत्यांची पसंती मिळाली आहे. अशातच तिच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.

त्याचे झाले असे की, रविना ही मुंबईतील अंधेरी मेट्रो स्टेशनवर स्पॉट झाली. यावेळी तिला पाहण्यासाठी आणि तिच्या सोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती.अशातच पापाराझ्झींनी फोटोसाठी रविनाला आग्रह केला. तेव्हा तिनं त्यांना चांगलेच खडसावल्याचे दिसून आले आहे. त्यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

रविना ही नेहमीच तिच्या परखड वक्तव्यासाठी ओळखली गेली आहे. त्यावरुन तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहत रविनानं तिची मतं मांडली आहेत. चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी त्याचे कौतुक केले आहे.विरल भयानीनं त्याच्या इंस्टावरुन तो व्हिडिओ व्हायरल केला आहे.

रविनाचं मेट्रो स्टेशनवर येणं आणि त्यात चाहते सोडून पापाराझ्झींनी तिला त्रस्त करणं हे तिला काही आवडलेलं नाही. तुमच्यामुळे प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. असे रविनानं म्हटले आहे. तिचा तो व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट दिल्या आहेत. आपण चालत जाऊया, आपल्यामुळे प्रवाशांना त्रास होता काम नये. अशी भूमिका रविनानं घेतली आहे.

रविनाच्या त्या भूमिकेचे उपस्थित प्रवाशांनी आणि सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे. रविनानं घेतलेली भूमिका कौतुकास्पद म्हणावी लागेल. तिच्या सारखे बाकीच्या सेलिब्रेटींनीही पापाराझ्झींबाबत भूमिका घ्यावी लागेल. असे म्हटले आहे.

Raveena Tondon Spotted Andheri Mumbai Metro station
Rahat Fateh Ali Khan Reacts : 'मी त्याची माफी मागितली आणि तो...'! प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान यांचे 'त्या' व्हिडिओवर स्पष्टीकरण

रविनाच्या प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास, तिची कर्मा कॉलिंग नावाची मालिका चर्चेत आहेत. तिच्या भूमिकेचे चाहत्यांकडून कौतुकही होत आहे. त्यात तिच्याशिवाय नम्रता शेठ, वरुण सूद, विक्रमजित विर्क, विराफ पटेल, रोहित रॉय यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com