'टाइमपास ३'च्या 'लव्हेबल' गाण्याची चाहत्यांना भुरळ, हृतावर लाइक्सचा पाऊस

हृताचा या गाण्यातील कोळी लूक पाहून चाहते वेडे झाले आहेत.
ravi jadhav marathi movie timepass 3 lovable song out
ravi jadhav marathi movie timepass 3 lovable song out sakal

timepass 3 : अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta durgule) सध्या बरीच चर्चेत आहे. हृताचे 'अनन्या' आणि 'टाइमपास 3' असे दोन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात 'टाइमपास' मधील तिच्या भूमिकेबाबत चाहते भलतेच उत्सुक आहे. प्रोमो मध्ये समोर आलेला तिचा अंदाज पाहून तरुणाई अक्षरशः तिच्या प्रेमात पडली आहे. आता 'टाइमपास 3'चे 'लव्हेबल' हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

(ravi jadhav marathi movie timepass 3 lovable song out)

ravi jadhav marathi movie timepass 3 lovable song out
ईश्वराच्या कृपने आम्ही सुखरूप वाचलो.. अपघातानंतर मंगेश देसाईने मानले आभार..

झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्सची निर्मिती, रवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास ३' येत्या २९ जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. दगडूचे वेड लावणारे प्रेम याआधी आपण सर्वांनीच पाहिले आहे. आता पुन्हा एकदा त्याच्या ‘लव्हेबल’ भावना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 'टाइमपास ३' मधील ‘लव्हेबल’ हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून हे गाणे प्रथमेश परब आणि हृतावर चित्रित करण्यात आले आहे.

या गाण्यामध्ये दगडू आणि पालवीमध्ये हळूवार खुलत जाणारे प्रेम दिसत आहे. प्रेमाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर बहरत जाणारे हे गाणे आर्या आंबेकर व हर्षवर्धन वावरे यांनी गायले असून याला अमितराज यांनी संगीत दिले आहे. तर क्षितीज पटवर्धन यांनी हे गाणे शब्दबद्ध केले आहे. यामध्ये हृताचा कोळी लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे.

गाण्याबद्दल दिग्दर्शक रवी जाधव म्हणतात, “काही दिवसांपूर्वीच प्रथमेशचे धमाल गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता ह्रता दुर्गुळे आणि प्रथमेश परब यांच्यातील नाजूक नात्यावरील ‘लव्हेबल’ गाणे आपल्या भेटीला आले आहे. यापूर्वीही ‘टाइमपास’च्या दोन्ही चित्रपटातील गाण्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यामुळे ‘टाइमपास ३’मधील गाणीही संगीतप्रेमींना नक्कीच आवडतील.”

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com