esakal | Bigg Boss 14 Winner: रुबीना की राहूल?; कोण जिंकणार?   
sakal

बोलून बातमी शोधा

reality show bigg boss 14 winner rubina dilaik bigg boss 14 winner 50 lakh rupees Rahul Vaidya runner up bigg boss 14 news

अंतिम फेरी मध्ये अली गोनी, राखी सावंत, निक्की तांबोळी, राहूल वैद्य आणि रूबीना दिलेक यांचा समावेश आहे.

Bigg Boss 14 Winner: रुबीना की राहूल?; कोण जिंकणार?   

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता ताणल्या गेलेल्या बिग बॉस स्पर्धेचा निकाल लवकरच जाहिर होणार आहे.  प्रेक्षकांच्या सर्वाधिक आवडीची मालिका म्हणून बिग बॉसकडे पाहिले जाते. वाद, भांडणे, शिवीगाळ, भडकाऊ वक्तव्ये यासाठी प्रसिध्द असणारा रियॅलिटी शो अशी बिग बॉसची ख्याती आहे. नेहमीप्रमाणे यंदाचा सीझनही वादाच्या भोव-यात सापडला होता. या सीझनमध्ये तगडी स्पर्धा होती.

रियॅलिटी शो बिग बॉसच्या 14 व्या सीझनचा निकाल रविवारी जाहीर होणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये राखी जिंकणार की रुबीना अशी चर्चा रंगली होती. अखेर त्यात रुबीनाचं पारडं जड असल्याचे सांगितले जात आहे. तर उपविजेता म्हणून राहुल वैद्य याच्या नावाची चर्चा आहे. जर रूबीना जिंकली तर 36 लाख रुपये तिला मिळणार आहेत. शो च्या सुरुवातीपासूनच रुबीनाने चाहत्यांची पसंती मिळवली होती. ती या शो मधील सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धक होती.

अंतिम फेरी मध्ये अली गोनी, राखी सावंत, निक्की तांबोळी, राहूल वैद्य आणि रूबीना दिलेक यांचा समावेश आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुबीनाची जिंकण्याची शक्यता आहे. रुबीनाला आतापर्यत 35 टक्के प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. तर राहूलला 34.5 टक्के प्रेक्षकांनी वोटिंग केले आहे. त्यामुळे या दोघांमध्ये नेमकं कोण जिंकणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. राहूल वैद्य आणि अली गोनीनं मध्ये काट्याची टक्कर आहे. तर राखी सावंत आणि निक्की तांबोळी शेवटच्या स्थानावर आहे.

पत्नी गरोदर असताना अभिनेत्याचं निधन; चिमुकल्याकडून वडिलांच्या शेवटच्या...

एका वृत्तपत्रानं घेतलेल्या वोटिंग पोलनुसार, रुबीना दिलेक विजेती होणार असल्याचे सांगितले आहे. मात्र त्यासाठी तिला राहूलचे तगडे आव्हान परतावावे लागणार आहे. विशेष म्हणजे जॅस्मिन भसीन आपला मित्र अली गोनीसाठी प्रेक्षकांना आवाहन करताना दिसत आहे. टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिध्द सेलिब्रेटी म्हणून जॅस्मिनची ओळख आहे. अशावेळी तिच्या त्या सेलिब्रेटीपणाचा फायदा अलीला किती होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सलमान खान दरवर्षी प्रमाणे यंदाही ग्रँड फायनलच्या शो चे सुत्रसंचालन करणार आहे. 
 
 
 
 
 

loading image