Janhvi Kapoor: 'मिली'च्या स्क्रीनिंगला रेखाच्या कानात काय कुजबुजली जान्हवी? समोर आली भावूक गोष्ट

'मिली' सिनेमाच्या स्क्रीनिंगच्या वेळचा रेखा आणि जान्हवीच्या भेटीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Rekha attends mili screening janhvi kapoor shares her happiness watch video
Rekha attends mili screening janhvi kapoor shares her happiness watch videoGoogle
Updated on

Janhvi Kapoor: जान्हवी कपूरच्या 'मिली' सिनेमाचं स्क्रीनिंग नुकतंच मुंबईत पार पडलं. यावेळी बॉलीवूडच्या अनेक बड्या हस्तींनी हजेरी लावली होती. पण या सगळ्यांमध्ये लक्ष वेधून गेल्या त्या अभिनेत्री रेखा. रेखा फारसं कुठल्या स्क्रीनिंगला हजेरी लावताना दिसत नाहीत. मिली च्या स्क्रीनिंगला मात्र रेखा आपली पर्सनल असिस्टंट फरजाना सोबत पोहोचल्या. त्यांना पाहिल्यावर जान्हवीला मात्र आकाश ठेंगणं झालं. रेखा यांनी देखील जान्हवीला घट्ट अलिंगन दिलं तेव्हा जान्हवीनं त्यांच्या कानात काहीतरी सांगितलं, त्या क्षणानं मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.(Rekha attends mili screening janhvi kapoor shares her happiness watch video)

हेही वाचा: भारतीय मंदिरे- धार्मिकतेबरोबरच सामाजिक अंगे जपणारी केंद्रे

Rekha attends mili screening janhvi kapoor shares her happiness watch video
Amruta Subhash: 'वंडर वूमन' बनलेल्या अमृता सुभाषनं वेधून घेतलं लक्ष...पाहिलात का ट्रेलर?

तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून वाटत आहे की जान्हवी रेखाच्या साडीची प्रशंसा करताना दिसत आहे,आणि तेच तिनं त्यांच्या कानात सांगितलं असावं असा अंदाज नेटकरी लावत आहेत. पण आम्ही सांगतो नेमकं काय म्हणाली रेखाच्या कानात जान्हवी कपूर.

Rekha attends mili screening janhvi kapoor shares her happiness watch video
Sai Tamhankar: असं काय घातलंय सईने की तेजस्विनी पंडीत म्हणाली,अबब!

'मिली' मध्ये जान्हवीसोबत विकी कौशलचा भाऊ सनी कौशल देखील आहे. जेव्हा जान्हवी मिलीच्या स्कीनिंगवेळी रेखा यांना भेटली तेव्हा तिच्या डोळ्यात विशेष चमक दिसली. तर रेखाच्या डोळ्यातही श्रीदेवी-बोनी कपूरची मुलगी जान्हवीप्रती प्रेम दिसलं. जान्हवीनं त्यावेळी रेखाला आलिंगन दिलं आणि त्यांच्या कानात म्हटलं,''तुम्ही विचारही करू शकत नाही की मी आज किती खूश आहे''. त्यानंतर जान्हवीनं रेखाच्या साडीची प्रशंसा केली. सगळ्यात इंट्रेस्टिंग गोष्ट ही की रेखा यावेळी जान्हवीसाठी स्पेशल गिफ्ट घेऊन आल्या होत्या.

सोशल मीडियावर रेखा आणि जान्हवीचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओला पाहून नेटकरी रेखाच्या सौंदर्याची प्रशंसा करताना दिसत आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,'रेखा आजही किती सुंदर दिसते'. तर दुसऱ्या एकानं कमेंट केली आहे की,'ती कधीच म्हातारी होणार नाही,ती खूप सुंदर आहे'. तर तिसऱ्या एकानं चक्क जाहीर करून टाकलं की,'रेखाच्या सौंदर्यापुढे बॉलीवूडच्या सगळ्याच अभिनेत्री फेल आहेत'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com