ऋषी कपूर यांच्या निधनाला महिना झाल्याच्या आठवणीत मुलगी रिद्धीमा झाली भावूक, म्हणाली...

rushi kapoor.
rushi kapoor.

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाला आज एक महिना झाला आहे. त्यांचे कुटुंबीय आजही या दुःखातून सावरलेले नाही. ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धीमाने अत्यंत भावुक होऊन एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत रिद्धीमाने म्हटले आहे की, 'आज तुम्हाला जाऊन एक महिना झाला आहे. आम्ही तुमची दररोज आठवण काढतो.' रिद्धीमा दिल्लीत राहते आणि ऋषी कपूर यांचे निधन झाले त्यावेळी लाॅकडाऊनमुळे तिला त्यांचे अंतिम दर्शन घेता आले नाही. आजही ती गोष्ट तिच्या मनाला भरपूर सलत आहे.

अभिनेते ऋषी कपूर यांचे ३० एप्रिल रोजी रुग्णालयात निधन झाले. लाॅकडाऊन असल्यामुळे काही मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने फक्त कपूर कुटुंबीयच नाही तर संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीला तसेच ऋषी कपूर यांच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला. त्यांची आठवण सदैव स्मरणात राहील अशीच आहे. 

ऋषी कपूर यांच्या निधनाच्या वेळी त्यांची मुलगी रिद्धीमा दिल्लीहून मुंबईला येण्यास निघाली होती. परंतु तिला आपल्या पित्याचे अंतिम दर्शन घेता आले नाही. ती चुटपूट आणि रुखरुख आजही तिला सतावते आहे. सध्या ती आपल्या आईसोबत आहे. रिद्धीमा ही ऋषी आणि नीतू कपूर यांची मोठी मुलगी. रणबीर कपूरपेक्षा दोन वर्षांनी ती मोठी. सन २००६ मध्ये तिचा दिल्लीतील बिझनेसमन भरत सहानी यांच्याबरोबर विवाह झाला. आता त्यांना नऊ वर्षांची एक मुलगी आहे. रिद्धीमा आपल्या कुटुंबीयांबरोबर दिल्लीत राहते.

आज ऋषी कपूर यांच्या निधनाला एक महिना झाला आणि त्यांच्या मुलीने अर्थात रिद्धीमाने एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला तसेच त्यांची पत्नी नीतू कपूरनेदेखील एक जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना नीतू यांनी लिहिले की,'मला गुडबाय म्हणण्याआधी मला गूडलक विश करा. मला शुभेच्छा द्या की मी पुढील जीवन अश्रुंसोबत नाही तर आनंदाने घालवू शकेन. मला एक स्मित हास्य द्या म्हणजे तिला घेऊन मी आयुष्यभर जगू शकेन.' रिद्धीमाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर करण्यासोबतच ऋषी कपूर यांचा फोटो देखील शेअर केला आहे.

Remembering the month of Rishi Kapoor's demise, daughter Riddhima became emotional, said 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com