esakal | 'तुझ्याशिवाय जगणं नाही शक्य', सुशांतसाठी रियाची भावनिक पोस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

sushant and rhea

'तुझ्याशिवाय जगणं नाही शक्य', सुशांतसाठी रियाची भावनिक पोस्ट

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (bollywood actor sushat singh rajput) मृत्युला एक वर्ष पूर्ण झाले आहे. आज त्याचा पहिला स्मृतिदिन आहे. त्यानिमित्तानं बॉलीवूडमधल्या अनेक सेलिब्रेटींनी त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीची (rhea chakraborty) पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. तिनं भावनाशील होत लिहिलेल्या पोस्टला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. सुशांतचा मृत्यु याचा तपास अद्याप सुरु आहे. त्याबाबत वेगवेगळ्या प्रकारची मतमतांतरे आहेत.(Rhea Chakraborty share post on Sushant Singh Rajput Death Anniversary)

रियानं सोशल मीडियावर (social media) लिहिले आहे, सुशांत तुझ्याशिवाय जगणं याची कल्पनाच करता येत नाही. मला तुझी खूप आठवण येते. रियाचं अशाप्रकारे व्यक्त होण, सुशांतच्या चाहत्यांच्या मनाला चटका लावून जाणारे आहे. सुशांतच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं रियासोबत बॉलीवू़डच्या अनेक सेलिब्रेटींनी सुशांतला आदरांजली वाहिली आहे. यात भूमी पेडणेकर, राजकुमार राव, दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि मुकेश छाब्रा यांचा समावेश आहे.

14 जून 2020 मध्ये वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी सुशांतनं त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यानंतर अद्याप त्या प्रकरणाचा तपास वेगवेगळ्या तपास यंत्रणा करत आहेत. मात्र अजूनही सुशांतच्या चाहत्यांना त्याच्या मृत्युमागील कारण कळालेलं नाही. त्यावरुन चाहत्यांनी संबंधित यंत्रणेला अनेकदा प्रश्न विचारले आहेत. जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरु होता तेव्हा त्यानिमित्तानं बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनही समोर आले होते.

हेही वाचा: केंद्राकडून परवानगी, सुपरस्टार रजनीकांत जाणार अमेरिकेला...

हेही वाचा: 'बेल बॉटम'च्या मानधनाच्या चर्चांवर अक्षय कुमारचा खुलासा

रियानं सुशांतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात तिनं लिहिलं आहे, तुझ्याशिवाय मी असणं याची कल्पना करवत नाही. तु नाहीस हे गोष्ट सतत मला त्रस्त करत असते. तु माझं सर्व काही होतास. तुझ्यासारख्या माणसाला गमावणं याची वेदना मी सहन करत आहे. तु माझा पालक होतास. मी आता तुझ्याच टेलिस्कोपनं तुला आकाशात पाहत असते. मला माहिती आहेस तु त्या आकाशातून माझ्याकडे पाहत, माझी नेहमी काळजी घेतो आहेस. मी जेव्हा सभोवताली पाहते तेव्हा मला सगळीकडे तु दिसतो आहेस. मी तुला माझ्यापासून वेगळं करु शकत नाही. अशा शब्दांत रियानं आपली भावना व्यक्त केली आहे.

loading image