रिया चक्रवर्तीने 'या' कारणासाठी ८ जूनला सोडलं होतं सुशांतचं घर, वकिलांचा खुलासा

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Tuesday, 1 September 2020

सुशांतच्या कुटुंबियांनी सुशांतच्या आजाराविषयी काहीच नाहिती नसल्याचा दावा केला होता मात्र नुकत्याच समोर आलेल्या त्याच्या बहीणीच्या चॅटमधून समोर आलं आहे की त्यांना त्यांच्या आजाराची कल्पना होती. ज्याबाबत आता रियाच्या वकिलांनी एक महत्वाचा खुलासा केला आहे. 

मुंबई- दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यु प्रकरण दिवसेंदिवस क्लिष्ट होत चाललं आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असल्याने गुंता अधिकंच वाढत चालला आहे. सुशांतच्या कुटुंबियांनी सुशांतच्या आजाराविषयी काहीच नाहिती नसल्याचा दावा केला होता मात्र नुकत्याच समोर आलेल्या त्याच्या बहीणीच्या चॅटमधून समोर आलं आहे की त्यांना त्यांच्या आजाराची कल्पना होती. ज्याबाबत आता रियाच्या वकिलांनी एक महत्वाचा खुलासा केला आहे. 

हे ही वाचा: सुशांतने बँकॉक ट्रीपमध्ये खास सारा अली खानसाठी बुक केलं होतं चार्टर्ड विमान

सुशांत आणि त्याची बहीण प्रियांकाचं व्हॉट्सअप चॅट नुकतंच समोर आलं आहे. यामध्ये प्रियांकाने सुशांतचा एंजायटी आणि डिप्रेशनवरील काही औषधं घेण्याचा सल्ला दिला होता. सुशांतजवळ या गोळ्यांचं प्रिस्क्रिप्शन नव्हतं तेव्हा प्रियांकाने ते कुठुनतरी मिळवून दिलं होतं. हे चॅट्स ८ जूनचे सकाळी सुमारे १०च्या आसपासचे आहेत. रिया याच दिवशी १२च्या आसपास सुशांतच्या घरुन निघून गेली होती. याचसंदर्भात रिया चक्रवर्तीचे वकिल सतीश मानशिंदे यांनी महत्वाचा खुलासा केला आहे.

त्यांनी म्हटलंय, '८ जूननंतर सुशांतच्या बहीणींनी त्याच्यावर पूर्णपणे कंट्रोल केला होता. तसंच रियाने तिच्या जबाबात सांगितलं आहे की सुशांत आणि त्याची बहीण प्रियांकाने चॅटवर एकमेकांसोबत चर्चा केली होती. रिया प्रियांकाने सांगितलेल्या औषधांच्या विरोधात होती. सुशांतने दुसरी औषधं घेऊ नये असं रियाला  वाटत होतं. सुशांतच्या डॉक्टरांनी देखील सुशांतला ही औषधं घेण्यासाठी मनाई केली होती.'

हे ही वाचा: सुशांतच्या चॅटमधून खुलासा- बहीण प्रियांका देत होती एंजायटी-डिप्रेशनची औषधं घेण्याचा सल्ला

वकिलांनी पुढे म्हटलंय की, 'सुशांतच्या कुटुंबियांनी सीबीआय, सुप्रीम कोर्ट आणि मुंबई पोलिसांना चुकीचा जबाब दिला आहे की रिया चक्रवर्ती सुशांतला चूकीची औषधं देत होती. रिया आणि सुशांतमध्ये ८ जूनला जे भांडण झालं होतं त्यानंतर सुशांतने रियाला घरातून निघून जायला सांगितलं होतं.' आत्तापर्यंत सुशांत आणि रियामध्ये कशामुळे भांडण झालं हे कळत नव्हतं मात्र ही गोष्ट देखील समोर आली आहे.    

rhea chakrabortys lawyer reveals why actress left sushant singh rajput home on 8th june  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rhea chakrabortys lawyer reveals why actress left sushant singh rajput home on 8th june