शक्ती कपूर भावूक ! म्हणाले, माझ्यासाठी ऋषी कपूर एकदिवस आधी वाढदिवस साजरा करत

'माझ्यासाठी ऋषी कपूर एकदिवस आधी वाढदिवस साजरा करत'
Shakti Kapoor And Rishi Kapoor
Shakti Kapoor And Rishi Kapooresakal

Rishi Kapoor Birth Anniversary Shakti Kapoor Remembering Legend : शक्ती कपूरने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी दिवंगत ऋषी कपूर यांच्याबद्दल आठवणी ताज्या केल्या आहेत. शक्ती कपूरने आपल्या आणि ऋषी कपूरच्या वाढदिवसाबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या. शक्ती यांचा वाढदिवस ३ सप्टेंबर, ऋषीजींचा ४ सप्टेंबरला येतो. आम्हा दोघांचे जन्मवर्ष एकच आहे म्हणजे १९५२. तो माझ्यापेक्षा एक दिवस लहान आहे. ऋषी कपूरसोबत (Rishi Kapoor) माझे नाते खूप जुने आहे.

मी त्याच्यासोबत २५-३० चित्रपट केले असेल. मनमोहन देसाईचा 'नसीब', डेव्हिड धवनचा 'बोल राधा बोल', 'इना मीना डिका' हे मला आठवणारे काही लोकप्रिय सिनेमे सरगमला विसरू शकत नाही. हा सर्वात मोठा ब्लॉकबास्टर चित्रपट होता. म्हणूनच आम्ही बऱ्याच वेळेस एकत्र काम केले आहे.

Shakti Kapoor And Rishi Kapoor
दीपिका-रणवीरचा आलीशान बंगला खरेदीनंतर घेतली लग्झरी कार !

शक्ती कपूर (Shakti Kapoor) पुढे म्हणाले, माझ्या आयुष्यात खूप कमी लोक आहेत जे माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यापैकी एक ऋषी हे होते. आमच्या वाढदिवसाला एका दिवसाच्या अंतराने, त्यांनी एकदा मला विचारले की मी माझा वाढदिवस त्यांच्याप्रमाणे का साजरा करत नाही? मी त्यांना सांगितले की त्याच्यासारखी पार्टी आयोजित करण्यासाठी आणि १०० लोकांना आमंत्रित करण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत. (Bollywood News)

तेव्हापासून त्यांनी त्यांचा वाढदिवस एक दिवस आधी माझ्यासोबत साजरा करायला सुरुवात केली जेणे करून आपण तो एकत्र साजरा करू शकू. आरके स्टुडिओमध्ये त्यांनी माझ्यासाठी दोन केक असायचे, एकावर त्यांचे नाव होते आणि दुसर्‍यावर माझे होते.

Shakti Kapoor And Rishi Kapoor
Rishi Kapoor यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नीतू कपूर यांनी शेअर केला फोटो

शक्ती कपूर म्हणाले की, 'हा तो काळ होता जेव्हा इंडस्ट्रीतील लोक माझ्या कामाची दखल घेऊ लागले. लोक म्हणायचे, 'होय शक्ती कपूर सुद्धा असाच काहीसा आहे ज्याचा वाढदिवस ऋषी कपूर इंडस्ट्रीत साजरा करत आहे!' आमची मुलं लहान असताना आम्ही काही सुट्टीला एकत्र जायचो.

माझ्याकडे अजूनही आमच्या मुलांचे एकत्र फोटो आहेत. ऋषी अत्यंत बुद्धिमान आणि कल्पक होते. तो सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक होता, असे मला म्हणण्याची गरज नाही. एकदा का त्याने तुम्हाला आपला मित्र मानला की तो तुमच्याचच होत असे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com