Breaking : निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा रखडली; पटियाला हाऊस कोर्टाचा स्थगितीचा निर्णय!

वृत्तसंस्था
सोमवार, 2 मार्च 2020

जोपर्यंत दोषींना फाशी होणार नाही, तोपर्यंत ते फाशीची शिक्षा रद्द करण्याचे सगळे प्रयत्न करून पाहतील. त्यामुळे आम्हीही ही केस लढवत आहोत. आम्ही इथेच राहणार, ऐकणार. सात वर्षांपासून लढत आहोत, आता शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार.

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निर्भयाच्या दोषींची दया याचिका फेटाळून लावल्यानंतरही आता या सर्व आरोपींची फाशी तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. पटियाला हाऊस कोर्टाने पुढील निर्णयापर्यंत दोषींना ठोठावण्यात आलेली फाशीची शिक्षा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. 

डेथ वॉरंट रद्द होणार?

सुप्रीम कोर्ट आणि पटियाला हाऊसच्या निर्णयानंतर दोषींचे वकील एपी सिंह यांनी शेवटचा दावा ठोकला आहे. दुपारच्या सुमारास दोषी पवनकुमारने दया याचिका राष्ट्रपतींकडे दाखल केली. तसेच डेथ वॉरंट रद्द करण्यासाठीही पटियाला हाऊसमध्ये अर्ज दाखल केला.  राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळून लावली. मात्र, पटियाला हाऊस कोर्टाने निकालाला स्थगिती दिली आहे.

निर्भयाच्या आई-वडिलांनीही दोषींचे वकील एपी सिंह यांच्या वकिलीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. गेल्या वेळेस डेथ वॉरंट जारी केल्यानंतर सिंह यांनी पवनकुमार यांचे वकील नसल्याचे म्हटले होते. तर आज त्यांनी पुन्हा एकदा शेवटचा दावा दाखल केला आहे. त्यामुळे तो फेटाळून लावणेच सोईचे होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.  

 - Nirbhaya Case:दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा, कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

राष्ट्रपतींनी फेटाळली पवनची दया याचिका

निर्भयाच्या दोषींनी सोमवारी (ता.२) फाशी रद्द व्हावी, यासाठी सुप्रीम कोर्ट, पटियाला हाऊस कोर्ट आणि राष्ट्रपती भवन अशा सर्व ठिकाणी चाचपणी करून पाहिली. दोषी पवनची दया याचिका सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर राष्ट्रपतींनीही पवनची दया याचिका फेटाळून लावली आहे. तर पटियाला हाऊसनेही अक्षय आणि पवन यांची डेथ वॉरंटचा निर्णय लांबणीवर टाकला आहे.

- 'PMOतील हिंदुत्वविरोधी अधिकारी शरद पवारांच्या संपर्कात'

निर्भयाची आई म्हणाली...

जोपर्यंत दोषींना फाशी होणार नाही, तोपर्यंत ते फाशीची शिक्षा रद्द करण्याचे सगळे प्रयत्न करून पाहतील. त्यामुळे आम्हीही ही केस लढवत आहोत. आम्ही इथेच राहणार, ऐकणार. सात वर्षांपासून लढत आहोत, आता शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार. सुप्रीम कोर्टाला आमच्या मुली आणि समाजाला उत्तर द्यायचे आहे. आपल्या देशाची न्यायव्यवस्था नेहमी सत्याच्या पाठीशी राहील. उद्या त्यांना फाशी होईलच. 

- Delhi Violence : ईशान्य दिल्ली हळूहळू येतेय पूर्वपदावर; जाणून घ्या कशी आहे तेथील सद्यस्थिती!​

निर्भयाच्या कुटुंबीयांकडून केस लढविणाऱ्या वकिलांनीही दोषींचे वकील सिंह यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, वकील ए. पी. सिंह यांनी कोर्टाची दिशाभूल केली आहे. ते पवनचे वकील आहेत, असे म्हणत असले तरी त्यांनी वकीलपत्र दाखल केलेले नाही. त्यामुळे उघडउघड ही कोर्टाची दिशाभूल केल्यासारखं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nirbhaya Case Patiala House Court reserved the order on convict Pawan Guptas plea