रितेशनं शेवटी जेनेलियापुढे हात जोडले....

रितेश आणि जेनेलिया सोशल मीडियावर चर्चेत असणारी जोडी आहे.
ritesh and genelia
ritesh and genelia Team esakal

मुंबई - बॉलीवूडचा प्रसिध्द (bollywood actor) अभिनेता रितेश देशमुश (ritesh deshmukh) हा त्याच्या व्हिडिओमुळे सध्या चर्चेचा विषय आहे. त्यानं 2003 मध्ये तुझे मेरी कसम मधून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं. त्यावेळी त्या चित्रपटात त्याची सहकलाकार जेनेलियाच होती. त्यांचा तो चित्रपट त्यावेळी बॉक्स ऑफिसवर फार चालला नाही. मात्र त्यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. हे दोन्ही कलाकार सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. त्यांचे व्हिडिओही कमालीचे लोकप्रिय होतात. लॉकडाऊनच्या वेळी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तयार करुन चाहत्यांची पसंती मिळवली होती. (riteish deshmukh and genelia d souza comedy video goes viral)

रितेश आणि जेनेलिया (ritesh and geneliya) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह (Social media active story) असणारी जोडी आहे. त्यांचे व्हिडिओ प्रेक्षकांना कमालीचे आवडतात. त्यांच्या त्या व्हिडिओला लाखो व्ह्युजही असल्याचे दिसून आले आहे. सध्या जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यात तिनं सांगितलं, रितेश माझ्या गप्पा ऐकून बोअर झाला आहे. त्यामुळे आमच्यात वादावादी सुरु होते. यानंतर जेनेलियाचा राग वाढतो. त्यानंतर रितेशला आपली चूक कळून येते. आणि तो तिची माफी मागतो. यावेळी रितेश तिची हात जोडून माफी मागतो. या व्हिडिओला आतापर्यत 3.3 मिलियन व्ह्युज मिळाले आहेत.

ritesh and genelia
पाऊस आला रे आला, राखीचा आनंद गगनात मावेना...

रितेश देशमुखच्या (ritesh deshmukh) आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास तो आता लवकरच बच्चन पांडे यांच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्यात त्याच्या जोडीला अक्षय कुमार असणार आहे. रितेश देशमुख हा बागी चित्रपटाच्या तिस-या भागामध्ये दिसला होता. तो कॉमेडी फ्रॅचायसीचाही एक महत्वाचा भाग राहिला आहे. रितेशची पत्नी जेनेलियानं तुझे मेरी कसममधून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले होते. त्यानंतर तिला टॉलीवूडमध्ये लोकप्रियता मिळाली होती. जेनेलियानं जाने तु या जाने ना या चित्रपटात काम केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com