Ranveer singh :अखेर दीपिका बोलली ! नवऱ्याच्या न्यूड फोटोशूटवर दिली प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranveer Singh And Deepika Padukone

Ranveer singh :अखेर दीपिका बोलली ! नवऱ्याच्या न्यूड फोटोशूटवर दिली प्रतिक्रिया

रणवीर सिंगच्या न्यूड फोटो इंटरनेटवर व्हायरल झाली आहेत. प्रत्येक जण त्यावर चर्चा करित आहे. रणवीर आणि दीपिका या दोघांनीही आतापर्यंत इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केलेले नाहीत. मात्र ते व्हायरल झाली आहेत. त्यावर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींना फोटो आवडत असून काही मात्र टीका करित आहेत. आता दीपिका पदुकोणचीही (Deepika Padukone) प्रतिक्रिया समोर आली आहे.

हेही वाचा: Photo: रणवीरच नाही, 'या' सेलिब्रिटींच्या न्यूड फोटोचीही रंगलेली चर्चा...

मनापासून...

रणवीर सिंगचे (Ranveer Singh) हे फोटोशूट खूप अगोदर येणे अपेक्षित होते. मात्र त्याला उशीर झाला. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार हे शूट पूर्वीच चांगल्या प्रकारे नियोजित होते. रणवीरचे याबाबतचा दृष्टीकोन स्पष्ट होता. तो आपल्या कपड्यांवरुन इतरांना नेहमी आश्चर्यचकित करित असतो. आपल्या न्यू फोटोसाठीही त्याने प्रामाणिकपणे काम केले. रणवीरसाठी ही खूपच अवघड गोष्ट नव्हती.

हेही वाचा: Narendra Modi : 'मोदीजी तर झोळी घेऊन निघाले, लोकही देश सोडू लागले'

दीपिका पदुकोणला फोटो आवडले

दीपिका पदुकोणच्या प्रतिक्रियेबाबत आलेल्या वृत्तानुसार, ती फोटो पाहून खूपच प्रभावित झाली. ती सुरुवातीपासून या शूटसाठी लूपमध्ये होती. तिला ही कल्पना खूपच आवडली होती. इंटरनेटवर येण्यापूर्वीच फोटो तिला दाखवले गेले होते. दीपिका रणवीरला नेहमी पाठिंबा देत आली आहे. तसेच या शूटसाठीही ती पूर्णपणे बरोबर होती.

Web Title: Deepika Padukone Reaction On Ranveer Singh Bold Photoshoot

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..