
Roadies 19 Video: पहिला पगार आला आणि बाप..रोडिजच्या स्पर्धकाला ती गोष्ट सांगताना आलं रडू
'रोडीज कर्म या कांड' चा सिझन 19 चा सिझन सुरू झाला आहे. सध्या त्याचे ऑडिशन्स सुरू आहेत. दर शनिवार आणि रविवारी संध्याकाळी 7 वाजता Jio सिनेमा आणि MTV वर देखील तुम्हाला ते पाहता येईल.
या शोबद्दल बोलायचं झालं तर यात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात. त्याच्या वेगवेगळ्या स्टोरी असतात. त्याच्या आयूष्यात असे काही भयानक प्रंसग घडलेले असतात की ते हृदयाला भिडतात. असेच काहीसं पुन्हा एकदा या सिझनमध्ये झालेले दिसले. तिची स्टोरी ऐकल्यानंतर रिया चक्रवर्ती, गौतम गुलाटी, प्रिन्स नरुला यांनाही रडू आवरलं नाही.
या शोचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका मुलीचा आहे. ज्यात ती स्वतःबद्दलचे असे रहस्य उघड करत असतांना त्या स्पर्धकाने तिच्या फॉर्ममध्ये लिहिले आहे की तिला तिच्या वडिलांचा मृत्यू व्हावा असं हवं होत.
जेव्हा तिला प्रिन्सने जेव्हा तिला हा प्रश्न विचारला तेव्हा तिने सांगितले की, 'लहानपणापासून तिला असा एकही दिवस आठवत नाही जेव्हा तिला मारहाण झाली नसेल. तिचे वडील नेहमी रात्री दारूच्या नशेत यायचे आणि त्यांना मारहाण करायचे. त्यावेळी तिला वाटायचं की एकतर तिला मारून टाकावं किंवा तिच्या वडिलांना मारून टाका. ज्याने आयुष्य चांगले होईल.
जेव्हा रिया त्या स्पर्धकाला विचारते की तू तुझ्या वडिलांवर हातही उचलला होताच. त्यानंतरच्या उत्तराने सर्वांचेच मन व्यथित झालं. या प्रश्नाला उत्तर देताना ती म्हणते, 'त्यावेळी मी 17-18 वर्षांची होते. जेव्हा वडिल माझ्या आईला मारत असतांना मी तिला वाचवले. आणि मी माझ्या वडिलांशी भांडली. मात्र, त्यानंतरही ते थांबला नाही.
ती पुढे म्हणते, 'जोपर्यंत तो जिवंत होता तोपर्यंत त्याने खूप शिवीगाळ केला. मला आठवतं की जेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की माझा पहिला पगार येईल तेव्हा त्या पैशातून मी तुझ्यासाठी काहीही घेणार नाही आणि मला आठवतं की ज्या दिवशी मला माझा पहिल्या कमाईचा चेक मिळाला त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला.
हा किस्सा ऐकल्यानंतर सर्वच जज भावुक झाले. सध्या हा व्हिडिए सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकरी कमेंटही करत आहे. काही तिला पाठिंबा देत आहेत तर काहींना हे सगळं स्क्रिप्टचा भाग वाटत आहे.