RRR चे दिग्दर्शक राजामौली 'नेटफ्लिक्स'वर नाराज! कारण धक्कादायक |RRR Movie Director SS Rajamauli angry on Netflix ott | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RRR movie news

RRR चे दिग्दर्शक राजामौली 'नेटफ्लिक्स'वर नाराज! कारण धक्कादायक

RRR Movie News: जगातील प्रतिभावंत दिग्दर्शकांमध्ये आता साऊथच्या एस एस राजामौली यांच्या नावाचा समावेश केला जातो. त्यांच्या बाहुबली चित्रपटानं हजार कोटींची कमाई केली होती. (Tollywood Movie News) बाहुबलीच्या दुसऱ्या चित्रपटानं देखील बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. राजामौली यांच्या आरआरआर जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हाही चाहत्यांचा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. (Netflix OTT News) अवघ्या दोन आठवड्यामध्ये या चित्रपटानं दोनशे कोटींचा टप्पा ओलांडला होता. साता समुद्रापार देखील आरआरआरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. अशा सगळ्या परिस्थितीत राजामौली यांना नेटफ्लिक्सकडून एक वाईट अनुभव आला होता.

राजामौली यांचा आरआरआर मार्चमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तो 20 मे रोजी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तो ओटीटीवर प्रदर्शित होण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. त्यात अनेक अडचणी आल्या होत्या. त्यावर निर्मात्यांनी ठरवलेल्या अटींनुसार तो ओटीटीवर व्हायरल झाला. मात्र यासगळ्यात राजामौली नाराज झाले आहेत. 20 मे रोजी तो स्ट्रीम झाल्यानंतर देखील आता त्याचा हिंदी व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे राजामौली चांगलेच नाराज झाले आहेत. त्यांना ही गोष्ट खटकली आहे. आरआरआरमध्ये ज्युनिअर एनटीआर, रामचरण, आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका केल्या आहेत. अजय देवगणनं देखील कॅमिओ केला होता. राजामौली यांनी सोशल मीडियावरुन देखील ही नाराजी व्यक्त केली होती.

राजामौली नाराज आहेत याचे कारण, फक्त हिंदी भाषेतच का आरआरआर का स्ट्रीम करण्यात आला, बाकीच्या भाषांना का डावलण्यात आले होते. त्याचे झाले असे की, राजामौली हे हॉलीवूडचे फिल्ममेकर्स रस्सो ब्रदर्ससोबत बातचीत करत होते. त्यावेळी त्यांनी ही गोष्ट त्यांना सांगितल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. रस्सो यांचा द ग्रे मॅन हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामध्ये धनुष हा मुख्य भूमिकेत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये द ग्रे मॅनचा प्रीमिअर प्रदर्शित झाला होता. त्यात बॉलीवूडचे वेगवेगळे सेलिब्रेटी हजर होते.

मी नेटफ्लिक्सवर नाराज आहे. याचे कारण त्यांनी आरआरआर हा फक्त हिंदीमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. बाकीच्या चार भाषांमध्ये तो का प्रदर्शित करण्यात आला नाही, हा माझा प्रश्न आहे. नेटफ्लिक्स यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे. मात्र त्यांनी आरआरआरच्या बाबत जे काही केले त्यामुळे नाराजी आहे.