'बाहुबली, RRR सारख्या कथा लिहिणार नाही, राजामौलींच्या वडिलांनी दिलं कारण'| v vijayendra prasad father ss rajamauli | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rrr movie news

'बाहुबली, RRR सारख्या कथा लिहिणार नाही, राजामौलींच्या वडिलांनी दिलं कारण'

RRR Movie News: टॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या नावाचा डंका आता केवळ भारतातच नाही तर जगभरात मिरवला जात आहे. (SS Rajamauli) बाहुबली नंतर त्यांच्या आरआरआरला मिळालेला प्रतिसाद मोठा होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं विक्रमी कमाई केली. राजामौली यांच्या या यशामध्ये त्यांच्या वडिलांचा विजयेंद्र प्रसाद यांचा मोठा वाटा आहे. त्यांनीच (Tollywood News) आरआऱआर आणि बाहुबलीची कथा लिहिली होती. आता त्यांनी एक मोठा खुलासा केला आहे. ते काय म्हणाले आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

काही दिवसांपूर्वी विजयेंद्र प्रसाद यांची राज्यसभेचे उमेदवार म्हणून निवडही झाली होती. त्यानंतर त्यांनी केलेली विधानं सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. त्यात काश्मीरमध्ये अजुन जी अशांतता आहे त्याचे कारण महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरु असल्याचे त्यांनी सांगितले. या विधानामुळे विजयेंद्र प्रसाद चर्चेत आले होते. आरआरआरमध्ये शोले नावाचे जे गाणे आहे त्यात देशातील वेगवेगळ्या महान देशभक्तांना आदरांजली वाहण्यात आली होती. त्यात गांधीजी आणि नेहरु यांचा समावेश नव्हता. त्याबाबत नेटकऱ्यांनी दिग्दर्शक राजामौली यांना विचारणाही केली होती.

आता विजयेंद्र यांनी यापुढील काळात आपण बाहुबली, आरआरआर सारख्या कथा लिहिणार नसल्याचे म्हटले आहे. एका मुलाखतीच्या वेळी त्यांनी सांगितले की, मी आता राज्यसभेच्या उमेदवार म्हणून घोषित झालो आहे. त्यामुळे माझी पहिली प्राथमिकता राज्यसभेचे कर्तव्य पार पाडणे ही असणार आहे. त्यानंतर मनोरंजन क्षेत्राकडे मी लक्ष देईल. राज्यसभेचे कामकाज संपल्यानंतर माझ्या हाताशी वेळ असल्यास मी नक्कीच वेगळ्या प्रकारच्या कथा लिहिण्यावर भर देणार आहे.

हेही वाचा: 'RRR' सुपरस्टार रामचरणच्या पत्नीचा आई न होण्याचा निर्णय, कारणही केलं स्पष्ट

सध्या विजयेंद्र प्रसाद हे सलमान खानच्या बजरंगी भाईजनाच्या सिक्वेल पवनपुत्र भाईजानची पटकथा लिहिण्यात व्यस्त आहे. तसेच त्यांच्याकडे राऊडी राठोड 2 आणि काही बंगाली व्यक्तिरेखांवर आधारित पटकथाचे काम असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: RRR: 'गांधी - नेहरुंमुळे काश्मीर अजुन जळतोय!' राजामौलींच्या वडिलांचं वक्तव्य

Web Title: Rrr Script Writer V Vijayendra Prasad Father Ss Rajamauli Take Big Decision

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..