RRR Movie
RRR Movieesakal

RRR Movie: काय राव असं असतं का?, अमेरिकेत इंटरवलनंतर प्रेक्षकांना काढलं बाहेर

एस एस राजामौली दिग्दर्शित आरआरआर हा चित्रपट आता प्रदर्शित झाला आहे.

RRR Movie: एस एस राजामौली दिग्दर्शित आरआरआर हा चित्रपट आता प्रदर्शित झाला आहे. मात्र त्यावरुन काही देशांमध्ये वादाला सुरुवात झाली आहे. द काश्मीर (The Kashmir Files) फाईल्सचा परिणाम हा या चित्रपटावर होईल असे सांगण्यात आले होते. मात्र थिएटरमध्ये आरआरआर हा जोरात सुरु आहे. त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. लहानांपासून मोठ्या प्रेक्षकांनी आरआरआरवर (RRR Movie) कौतूकाचा वर्षाव केला आहे. ज्युनिअर एनटीआर, रामचरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटामध्ये आहेत. (Tollywood News) पाच भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची चर्चा अमेरिकेपर्यत गेली आहे. अमेरिकेतील एका थिएटरमध्ये आरआरआरचं स्क्रिनिंग थांबवण्य़ात आल्याची बातमी व्हायरल झाली आहे. आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत.

आरआरआरनं अमेरिकेनं दोन दिवसांत दहा कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याचे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे अमेरिकेतील काही थिएटरमध्ये हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे सांगण्यात आले आहे. एस एस राजामौली यांचा चाहतावर्ग हा केवळ भारतातच नाहीतर परदेशात देखील मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. आता अशी एक बातमी समोर आली आहे की, अमेरिकेतील एका थिएटरमध्ये आरआरआरचा सेकंड हाफ दाखवण्यात आला नाही. त्यामुळे तेथील चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकारामुळे प्रेक्षकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. त्यांनी त्यासंबंधी थिएटरचालकाकडे तक्रारही केली. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. तीन तास एक मिनिटांचा हा चित्रपट केवळ दीड तासच दाखवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. इंटरवलनंतर आरआरआर सुरुच झाला नाही.

RRR Movie
RRR: राजमौलीला सहा महिने जेलमध्ये टाका, केआरकेनं तोडले अकलेचे तारे

आरआरआरच्या बॉक्स ऑफिस कमाईचा आकडा सांगायचा झाल्यास, त्यानं दोन दिवसांत जगभरातून 240 कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याचे बोलले जाते. चित्रपटामध्ये तेलुगू क्रांतीकारी अल्लुरी सीताराम राजु आणि कोमाराम भीम यांची एक काल्पनिक कथा सांगण्यात आली आहे. त्यांनी इंग्रजांना दिलेला लढा याचे प्रभावी चित्रण आरआरआरमध्ये करण्यात आले आहे. आतापर्यत प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद या चित्रपटाला मिळालेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com